Nandurbar Police Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Police : नंदुरबारमध्ये गॅस सिलेंडरचा अवैद्य धंदा; ६२ सिलेंडरसह मुद्देमाल हस्तगत

Nandurbar News : घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळा बाजार सर्रासपणे सुरु असल्याचे पाहण्यास मिळत आहे. ठिकठिकाणी हा अवैध व्यवसाय सुरु आहे. घरगुती गॅस सिलेंडरमधून गाड्यांमध्ये गॅस भरला जात असतो

Rajesh Sonwane

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या गॅस भरण्याचे प्रकार सुरू आहे. गॅस भरण्याच्या या काळ्या धंद्याच्या विरोधात पोलीस आता ॲक्शन मोडवर आली आहे. नंदुरबार शहरातील गजबजलेल्या परिसरात सुरू असलेल्या या धंद्यांवर आता पोलिसांनी कारवाई सुरू केली असून ६२ गॅस सिलेंडरसह गॅस भरण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. 

घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळा बाजार सर्रासपणे सुरु असल्याचे पाहण्यास मिळत आहे. ठिकठिकाणी हा अवैध व्यवसाय सुरु करण्यात येत असतो. घरगुती गॅस सिलेंडरमधून गाड्यांमध्ये गॅस भरला जात असतो. यामुळे काही ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. तरी देखील अशा प्रकारे अवैध धंदा सुरु असल्याचे पाहण्यास मिळते. नंदुरबार शहरात देखील हा प्रकार समोर आला आहे. 

नंदुरबार पोलिसांनी धाड टाकत कारवाई 

नंदुरबार शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गॅसचा अवैध धंदा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांच्या आदेशानुसार नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित मनेळ यांनी पथक तयार करून शास्त्री मार्केट परिसरात धाड टाकत कारवाई केली आहे. याठिकाणी गॅस सिलेंडरचा अवैध वापर होत असल्याचे समोर आले. 

१ लाख २ हजारांचा मुद्देमाल हस्तगत 

सदरच्या कारवाईत एकूण ६२ सिलेंडर, दोन वजन काटे यासह एकूण किमतीचे १ लाख २ हजार २०० रुपयांच्या मुद्देमालासह गॅस सिलेंडर बेकायदेशीरपणे प्रत्यक्ष विक्री करणारे दोन विक्रेत्याकडून जप्त करण्यात आले आहे. तसेच इन्डेन गॅस सिलेंडर कब्जात बाळगणाऱ्या शास्त्रीनगर येथील दोन्हींवर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT