Nandurbar Latest News: Saamtv
महाराष्ट्र

Nandurbar Accident News: हृदयद्रावक! ट्रक- दुचाकीचा भीषण अपघात; गर्भवती महिलेचा दुर्दैवी अंत, चालक फरार

Nandurbar Latest News: नंदुरबार शहरातील करण चौफळीवर खराब रस्त्यामुळे आणखी एक अपघात झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Gangappa Pujari

सागर निकवाडे, नंदुरबार|ता. २१ जून २०२४

नंदुरबारमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. नंदुरबार शहरालागत असलेल्या करण चौफुलीवर ट्रकच्या धडकेत एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून राज्यात जणू अपघातांचे सत्रच सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी सांगोल्यात एका भरधाव ट्रकने ४ महिला मजूरांना चिरडल्याची घटना घडली होती. अशीच भयंकर अपघाताची घटना नंदुरबारमध्ये घडली असून या दुर्घटनेत एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.

नंदुरबार शहरालगत असलेल्या करण चौफुलीवर आज सकाळी दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. ट्रकच्या धडकेनंतर दुचाकीवरील गर्भवती महिला खाली पडली अन् अवजड माल भरलेल्या ट्रकचे चाक तिच्या डोक्यावरुन गेले. ज्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कवा पाडवी असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, करण चौफुली नजीक दररोज लहान-मोठे अपघात होत असतात. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली असली तरी संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Close: बँकेची कामं पडणारं पेंडिंगवर; सोमवारी बँका असतील बंद, काय आहे कारण

Maharashtra News Live Update: Mumbai: गृहमंत्री अमित शाह यांची पत्रकार परिषद

Vastu Tips for Bathroom Taps: बाथरूममध्ये नळ बसवताना लक्षात ठेवाव्यात ‘या’ ५ महत्त्वाच्या टिप्स

Skincare Routine: फेसवॉश ते सनस्क्रीन; स्किनकेअर रुटीनमध्ये कोणते प्रोडक्ट कधी आणि कसे वापरायचे?

माजी पंतप्रधानांच्या नातवाचा कारनामा! तुरुंगातील फोनमध्ये सापडले 145 अश्लील व्हिडिओ; देशभरात खळबळ

SCROLL FOR NEXT