Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : दुरुस्तीच्या नावाखाली वर्षभरापासून खोदून ठेवला महामार्ग; राज्यमार्ग १ ची बिकट अवस्था

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि शहादा तालुक्यांना जोळणाऱ्या या महामार्गासाठी २८ कोटींच्या दोन निविदा काढून मक्तेदाराला रस्त्याचे काम देण्यात आले होते.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या राज्यमार्ग क्रमांक १ ची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. या मार्गाची (Nandurbar) दुरुस्ती करण्याच्या नावाखाली हा महामार्ग शासनाने वर्षभरापासून खोदून ठेवल्याने यातून मार्ग काढतांना वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. (Breaking Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि शहादा (Shahada) तालुक्यांना जोळणाऱ्या या महामार्गासाठी २८ कोटींच्या दोन निविदा काढून मक्तेदाराला रस्त्याचे काम देण्यात आले होते. मात्र शासनाकडून पैसे येत नसल्याने ठेकेदाराने देखील काम थांबवले आहे. यामुळे दुरुस्तीसाठी खोदून ठेवलेल्या या रस्त्यातून मार्गक्रमण करताना रोज वाहन धारक जायबंदी होत आहेत. या मार्गावर काही किरकोळ अपघात देखील रोज होत आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नागरिकांचा आंदोलनाचा इशारा 

अशात रुग्णवाहीका, शालेय विद्यार्थ्यी, शेतकरी यांना होत असलेल्या हालबद्दल न सांगितलेच बर. त्यामुळे आता या रस्त्याबाबत स्थानिकांमध्ये रोष असून रस्ता लवकरच दुरुस्त न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुरेश नाईक यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, CM देवेंद्र फडणवीस परवानगीबाबत स्पष्टच बोलले, पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Update: सांगली: विट्यात ४२ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त

गणेशोत्सवात अचानक काळीज पिळवटून टाकणारी बातमी; डबलबारीच्या सम्राटाची अचानक एक्झिट, भजनक्षेत्रात शोककळा

Lasanache Pani: फक्त ३० दिवस प्या लसणाचे पाणी, शरीराला होतील फायदेच फायदे

BRICS : भारताने ब्रिक्सला 'दिशाहीन' होण्यापासून कसे वाचवले? दिल्ली जाहीरनाम्यातील 'ते' ५ मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT