Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : ६५ लाख ३२ हजार किमतीचा गुटखा जप्त; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कार्यवाही

Nandurbar News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळोदा- पिसावर ते प्रकाशा रोडवरील देवपाट नाला जवळील एका पेट्रोलपंपासमोर टेम्पो संशयितरीत्या पोलिसांना आढळून आला.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : वाहतूक व विक्रीस बंदी असताना देखील सर्रासपणे गुटखा वाहतुक केली जात आहे. कारवाई होऊन देखील छुप्या (Nandurbar) पद्धतीने वाहतूक केली जात आहे. असाच अहमदाबादहून कर्नाटकच्या दिशेने जात असलेल्या ट्रकला पकडून सुमारे ६५ लाख ३२ हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नाकाबंदीमुळे पोलिसांना हा माल मिळून आला. (Live Marathi News)

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार तळोदा- पिसावर ते प्रकाशा रोडवरील देवपाट नाला जवळील एका पेट्रोलपंपासमोर टेम्पो संशयितरीत्या पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी याबाबत चालकाला विचारणा केली असता त्याने संशयास्पद उत्तरे दिले. त्या नंतर पोलिसांनी या गाडीची तपासणी केली असता त्यात सुमारे ५८ लाख ३२ हजार रुपये किमतीची महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली सुगंधित सुपारी व सात लाख रुपये किमतीचा टेम्पो असा ६५ लाख ३२  हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाकाबंदीमुळे झाली कारवाई 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली असून या काळात प्रलोभन देण्यासाठी पैशांची वाहतूक होण्याची शक्यता असते. या अनुषंगाने जिल्हा व राज्य सीमावर्ती भागात पोलिसांची नाकाबंदी करण्यात आली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात असून याच नाकाबंदीमुळे ६५ लाखाचा गुटखा पोलिसांना आढळून आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनाजीपंत, अंतरपाट ते बाळासाहेब...; ठाकरे बंधू फडणवीसांवर तुटून पडले

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

SCROLL FOR NEXT