FDA Raid Saam tv
महाराष्ट्र

FDA Raid: २ लाखांचा गुटखा जप्त; अन्नसुरक्षा विभागाची कार्यवाहीत ३ जणांना अटक

Nandurbar News : बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्यांवर अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार कारवाई करण्यात आली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: नंदुरबार शहरात अन्नसुरक्षा विभाग नाशिक यांच्यातर्फे बेकायदेशीररित्या महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंद (FDA) असलेला तंबाखू युक्त संबंधित पान मसाला, गुटखा विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्यात आली. (Nandurbar) नंदुरबार शहरातील तीन ठिकाणी धाडी टाकत सुमारे २ लक्ष ४६ हजार ९६६ रुपयांच्या मुद्देमालासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. (Live Marathi News)

महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंद असलेल्या तंबाखू युक्त पान मसाला, रजनीगंधा पान मसाला, करमचंद पान मसाला या तंबाखूयुक्त सुगंधित पान मसाला विक्रीवर बंदी आहे. तरी देखील याची सर्रासपणे विक्री केली जात आहे. अशा प्रकारे बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्यांवर अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार कारवाई करण्यात आली. नंदुरबारमध्ये येत नाशिकच्या पथकाने तीन ठिकाणी धड टाकून कारवाई केली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अटक करत गुन्हा दाखल 

नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात संबंधित विक्रेत्यांविरुद्ध नंदुरबार अन्नसुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी फिर्याद दाखल केली असून संबंधितांना मुद्देमालासह अटक करण्यात आली. त्यात अनिल दिलीप चौधरी, जगदीश कायस्थ तसेच रोहित संजय चौधरी यांना यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाईसाठी अटक करण्यात आली असल्याची माहिती अन्नसुरक्षा विभागाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तूप खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते? जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम

Maharashtra News Live Update: वणीत प्रकल्प बाधिताचा रोजगार मेळावा

Pune Mumbai Expressway Traffic Update: पुणे-मुंबई प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; बुधवारी तीन तास कनेक्टिंग लिंक बंद

Shocking: लाईट बिल कसं भरू? सफाई कर्मचारी महिलेला आलं एका महिन्याचं 2 लाख 18 हजाराचं वीजबिल

Hindu Religion: वर्षातून एकदा तरी 'कुलदेवतेला' का जावं? कुलदैवताच्या दर्शनाचे महत्त्व काय?

SCROLL FOR NEXT