Marriage saam tv
महाराष्ट्र

आशादायक..माझ्या डोळ्यांनी ‘त्यांना’ जग दाखवेन; डोळस नववधूचा विवाहावेळी संकल्प

आशादायक..माझ्या डोळ्यांनी ‘त्यांना’ जग दाखवेन; डोळस नववधूचा अंध युवकाशी विवाहावेळी संकल्प

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : डोळस तरुणीने दृष्टिहीन तरुणाशी लगीनगाठ बांधून समाजापुढे एक आदर्श उभा केल्याचे नुकतेच एका विवाह सोहळ्यातून पाहायला मिळाले. तीन दृष्टिहीन भाऊ-बहिणींपैकी दोघा भावांशी डोळस मुलींनी विवाह केल्याने टेम्बली (ता. पानसेमल, मध्यप्रदेश) येथील हा विवाह (Marriage) सोहळा विशेष चर्चेत आला. ते अंध असले म्हणून काय झाले, माझ्या डोळ्यांनी मी त्यांना जग दाखवेन, अशी प्रतिक्रिया नववधू गायत्रीने व्यक्त करीत जन्मोजन्मीच्या गाठी बांधल्या. (nandurbar news girl married a blind boy and statement happy life)

टेम्बली येथील सौ. किरण व आनंदा भीमराव मोहने या (Nandurbar News) दांपत्याला दोन मुले व मुलगी अशी तीन अपत्ये आहेत. तिघेही जन्मतः दृष्टिहीन आहेत. या सर्वांचे पालनपोषण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे अशक्य काम मोहने परिवाराच्या नशिबी आले. मात्र, ना कधी नशिबाला दोष दिला ना कधी कर्माचे फळ म्हणून हताश झाले. मोहने दांपत्याने दोन्ही मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. डोळ्यांनी पाहू शकत नसले, तरी अभ्यासात रस घेऊन आपल्या डोळ्यांपुढील काळोख दूर करून जीवन प्रकाशमय करण्यात ते यशस्वी झाले. या मुलांनी (Dhule) धुळे, मुंबई, पुणे, अमरावती अशा विविध ठिकाणी असलेल्या दृष्टिहीनांसाठीच्या शाळांमधून आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

नोकरी मिळाली पण जोडीदार मिळेल का? हा होता प्रश्‍न

शासनाच्या दिव्यांग कोट्यातून त्यांना नोकरी तर मिळाली, पण आयुष्याचा जोडीदार मिळेल का, हा प्रश्‍न गंभीर होता. पण म्हणतात ना, सात जन्माच्या गाठी या देवच बांधून पाठवतो तसेच झाले. योग्य शिक्षण, त्याच्या जोरावर नोकरी, देखणे असे असताना केवळ हे जग पाहू शकत नाहीत, म्हणून काय झाले, असा विचार करीत दोघांच्याही लग्नासाठी मुली सरसावल्या.

दोन्‍ही अंध भावांना मिळाल्‍या डोळस वधू

मोठा मुलगा सुरेश याचा विवाह अमरावती (Amaravati) येथे १० जानेवारीला बैतूल येथील ऊर्मिलाशी पार पडला. सुरेश शहादा येथे आयडीबीआय बँकेत लिपिक आहेत. त्यांची दृष्टिहीन बहीण सध्या शिक्षण घेत आहे. तर बंधू प्रवीण सध्या मध्य रेल्वेत खलाशीपदावर कार्यरत आहे. त्यांच्याशी वरखेडी (ता. धुळे) येथील सौ. संगीत व ज्ञानेश्‍वर अर्जुन खळाले या दांपत्याची कन्या गायत्री हिचा विवाह सर्वसंमतीने निश्‍चित झाला. शनिवारी (ता. १९) हा विवाह सोहळा टेम्बली येथे पार पडला.

अंध असल्‍याने काही होत नाही हृदय शुद्ध हवे..

विवाहानंतर गायत्रीने समाजाला एक संदेश देणारी प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, की अंध असल्यामुळे काहीही होत नाही. व्यक्तीचे हृदय शुद्ध असावे. प्रवीणशी बोलल्यानंतर तो आयुष्यभर आपल्यासोबत असेल, असे वाटले. त्यामुळे मी घरच्यांना लग्नासाठी संमती दिली. लग्नानंतर आम्ही दोघे नेहमी आनंदी राहू. मी त्यांना आयुष्यभर साथ देईन, माझ्या डोळ्यांनी मी त्यांना जग दाखवेन, असेही ती म्हणाली. या विवाह सोहळ्याला मोहने कुटुंबीयांच्या आप्तेष्टांसह समाजातील विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! सोलापूरकरांना आता मुंबई आणि गोव्यासाठी करता येणार हवाई सफर

Jui Gadkari: जुई गडकरी शुटिंग सुरू असताना सेटवर फावल्या वेळेत काय करते? Video केला शेअर

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT