Prakasha Barrage Saam tv
महाराष्ट्र

प्रकाशा बॅरेजचे दरवाजे बंद होताच मच्छीमारांची झुंबड

प्रकाशा बॅरेजचे दरवाजे बंद होताच मच्छीमारांची झुंबड

दिनू गावित

नंदुरबार : मागील महिनाभरात अधून मधून पाऊस सुरूच आहे. यामुळे तापी नदीला पुर कायम राहिला. यात नंदुरबार (Nandurbar) जिल्‍ह्यातील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडे होते. परंतु, आता ते बंद झाले असल्‍याने (Prakasha) प्रकाशा बॅरेजच्‍या पुढे पुर ओसरला आहे. यामुळे आता मच्‍छीमारांची गर्दी झालेली पहावयास मिळत आहे. (Nandurbar News Prakasha Barage)

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील हतनूर धरणातून (Hatnur Dam) सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नंदुरबार जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी नदीवरील (Sarangkheda Barrage) सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे दरवाजे गत १५ दिवसांपासून उघडण्यात आले होते. प्रकाशा येथील चार दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले गेल्याने पाणी बाहेर पडत होते. दरम्यान पाऊस कमी झाल्याने आणि हतनूर धरणातून विसर्ग बंद करण्यात आल्याने बॅरेज प्रकल्पांना दरवाजे बंद करण्याचे आदेश देण्यात आले. हे दरवाजे बंद झाल्यानंतर काही वेळात नदी पात्रात मच्छीमार बांधवांची अशी झुंबड उडाली होती.

एकाचवेळी अनेक जाळे

नदीपात्रात मोठ्या संख्येने मासे मिळण्याची शक्यता असल्याने एकाचवेळी अनेक जण जाळं घेत पाण्यात उतरले होते. यातून प्रकाशा पुलावरुन नदीपात्रात मच्छीमारांची शाळाच भरल्याचे दिसून आले. यातून अनेक मच्छीमारांना रोजगार देखील उपलब्ध होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT