Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : तोरणमाळ परिसरातून १० लाखांचा गांजा जप्त; सातपुड्यातील बुरुमपाडात होती शेती

Nandurbar News : तोरणमाळ परिसरातून १० लाखांचा गांजा जप्त; सातपुड्यातील बुरुमपाडात होती शेती

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : शेतात पिकांच्या आड गांजाची लागवड करून विक्री केली जात असते. असाच प्रकार तोरणमाळ (Toranmal) परिसरात समोर आला आहे. मका लागवड केलेल्या शेतात गांजा लागवड केल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी (Police) कारवाई करत १० लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्रातील २ नंबरचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथील बुरुमपाडा येथे एका शेतात अंगारशा रावल्या नाईक यांच्या शेतशिवारात असलेल्या मक्याच्या शेतात दीड एकरावर गांजाची लागवड केली होती. याबाबत पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना माहिती मिळाली होती. माहिती मिळाल्यावर (Nandurbar) त्यांनी शहादा व म्हसावद पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या. पोलिसांच्या पथकाने अचानक शेतात धाड टाकून ओल्या गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत. 

१३९ किलो ओला गांजा 

शेतात एकूण १३९ किलो ओला गांजा त्याची किंमत सात हजार रुपये किलोप्रमाणे ९ लाख ७३ हजार रुपये एवढी आहे. संशयित कोणसिंग अंगारशा नाईक यास अटक करण्यात आली आहे. तर दुसरा संशयित अंगरशा रावल्या नाईक हा फरार आहे. याबाबत हवालदार किरण वळवी यांनी फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडकींना सरकारी लाभ सोडवेना; अपात्र लाडकींनी वळवला 'या' योजनांकडे मोर्चा

Kalyan : बौद्धभूमी फाउंडेशन प्रकरणात मोठी अपडेट; श्रीकांत शिंदेंनी KDMC आणि MMRDA ला दिले सखोल चौकशीचे आदेश

कर्जमाफीच्या अटी, शेतकऱ्यांसाठी कटकटी; केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी?

'मोदींचे सरकार जाणार, आणीबाणी येणार'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Fact Check: शाहरूख खान कॉकरोच जनता पार्टीत जाणार? लवकरच पार्टी जॉईन करण्याची घोषणा?

SCROLL FOR NEXT