संजय सूर्यवंशी
नांदेड : राज्यात मागील आठवड्यात ज्या घटना घडल्या. त्यानंतर आरोग्य क्षेत्रात काय बदल होऊ शकतात? यावर चर्चा करण्यासाठी आलो आहे. राजकारण करण्यासाठी आलो नाही. पण नांदेडच्या (Nanded) घटनेबाबत डॉक्टर्सना दोष देउन चालणार नाही. संबधित खात्याने या घटनेची जबाबदारी घेणे आवश्यक आहे; असं सांगत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सरकारवर अप्रतक्ष टीका केली आहे. (Live Marathi News)
आम्ही मोर्चा काढू शकलो असतो, आंदोलन करु शकलो असतो. आरोप प्रत्यारोप केले असते पण आम्ही करणार नाही. अशा घटना पुन्हा होऊ नये; यासाठी काय करता येईल यासाठी मी आलो असं आदित्य ठाकरे म्हणाले. डॉक्टर्सना दोष देउन चालणार नाही. संबधित (Yuvasena) खात्याने या घटनेची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. पण कोणीच जबाबदारी घेत नाही. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी नांदेड यायला हवं होत पण ते आले नाहीत. राजकिय हेतूसाठी सर्वत्र फिरत आहेत. पण इकडे यायला त्यांना वेळ नाही; अश्या शब्दात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टिका केली.
पण सरकार काही बोलत नाही
नांदेडची घटना उघड झाल्यावर उच्च न्यायालयाने स्वतःहुन दखल घेत याचिका दाखल करुन घेलती. सगळेजण या घटनेबद्दल बोलत आहेत. पण सरकार काही बोलत नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. औषध खरेदी, पद भरती, सफाई कंत्राट याबाबत तातडीने निर्णय होउ शकतात. पण तस होत नाही अस आदित्य ठाकरे म्हणाले.
हेमंत पाटील यांना अटक होणार का?
शिंदे गटाने खासदार हेमंत पाटील यांनी अधिष्ठाना सौचालय साफ करायला लावल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, पण त्यांना अटक होणार का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला. स्टंटबाजी करुन काही होत नाही. तूम्ही गद्दारी करुन त्या सरकारमध्ये जाऊन बसलात ना मग सरकारला कामाला लावा. तुमच्याकडे आमदार खरेदी करण्यासाठी खोके आहेत, पण औषध खरेदीसाठी अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.