Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: चिन्ह गोठवले गेले, चिंता करण्याची गरज नाही; माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी

चिन्ह गोठवले गेले, चिंता करण्याची गरज नाही; माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी

दिनू गावित

नंदुरबार : दुर्दैवाने निवडणूक आयोगाकडून चिन्ह गोठवल गेले आहे. भविष्यात दोन्ही गटातील कोणालाही धनुष्यबाणाचे चिन्ह मिळेल. त्यामुळे जास्त चिंता करण्याची गरज नाही; अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuvanshi) यांनी व्यक्त केली आहे. (Nandurbar News Shiv Sena)

शिवसेनेचे (Shiv Sena) धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोटावल्याने शिंदे आणि ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. आता दोन्‍ही गटाला नवीन चिन्ह दिले जाणार आहेत. त्यासाठी उद्यापर्यंतची मुदत दिली आहे. चिन्ह गोठवल्याने दोघी गटाकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिंदे गटाचे नेते आणि (Nandurbar) माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील आपले प्रतिक्रिया दिली असून चिन्ह गोठवलं जाणं हे दुर्दैवी आहे.

भविष्‍यात एका पक्षाला चिन्‍ह

भविष्यात निवडणूक आयोगाला चिन्ह एका पक्षाला देणे गरजेचे राहणार असल्याची शक्यता देखील वर्तवली आहे. तर दुसरीकडे अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक नंतर निवडणूक आयोग चिन्हावर काही निर्णय घेतील अशी अपेक्षा माजी आमदार आणि शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

Sillod Assembly Election: भाजप आणि उद्धवसेनेचे सूर जुळले; ठाकरेंनीच दिली हाक

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार; जयंत पाटील यांचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT