Navapur Toll Plaza 
महाराष्ट्र

महाराष्‍ट्र– गुजरात सीमेवर ओव्हरलोड वाहनांना जबरदस्ती प्रवेश; तीन जणांवर गुन्हा

महाराष्‍ट्र– गुजरात सीमेवर ओव्हरलोड वाहनांना जबरदस्ती प्रवेश; तीन जणांवर गुन्हा

दिनू गावित

नंदुरबार : महाराष्ट्र- गुजरात सीमेवरील नवापूर तालुक्यातील बेडकी चेक पोस्ट नाका भ्रष्टाचारामुळे नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे. तपासणी नाक्यावरून अवजड वाहन चालकांकडून अवैध वसुलीचे प्रकार येथे वारंवार घडतात. यात ओव्‍हरलोड वाहनांना जबरदस्‍ती प्रवेश देण्याच्‍या वादातून तीन जणांवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. (nandurbar-news-Forced-entry-of-overloaded-vehicles-at-Maharashtra-Gujarat-border-on-three-people-police-fir)

बेडकी चेक पोस्‍ट नाक्‍यावर मोटार वाहन निरीक्षक अतुल रमेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तपासणी नाक्यावर क्षमतेपेक्षा जास्त भार असलेल्या दोन अवजड वाहनांना पुन्हा तपासणीसाठी पाठवले असता अरविंद गावीत, उल्हास गावित, मोना गावित (रा. बेडकी, ता. नवापूर) या तीन युवकांनी या वाहनांची तपासणी केली आहे. यांना जाऊ द्या असे सांगत सरकारी कामात अडथळा निर्माण करून मज्जाव केल्याने नवापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही संशयित आरोपींचा नवापूर पोलीस शोध घेत आहे.

रोजंदारीने ठेवले अन्‌ अवैध वसुली

आरटीओ अधिकारी, लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांच्या भ्रष्टाचाराचा अड्डा असलेला नवापूर सीमा तपासणी नाका सदर गुन्ह्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. नवापूर सीमा तपासणी नाक्याच्या उभारणीमुळे बेडकी गाव स्थलांतरित झाले असून अनेक नागरिकांची शेतजमीन गेली. येथील नागरिकांना रोजगार देणेही तेवढेच आवश्यक आहे. परंतु एकेकाळी आरटीओ अधिकाऱ्यांनी रोजंदारी पद्धतीने ठेवलेले युवक अवैध वसुलीमुळे परिवहन विभागाचे कर्दनकाळ ठरत असुन याचा त्रास वाहनचालकांना सोसावा लागत आहे. त्यामुळे याठिकाणी सुरू असलेली अवैध वसुली कधी थांबेल असा प्रश्न वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: आता ATMमधून काढा PF चे पैसे; १ एप्रिलपासून बदलणार EPFO सिस्टीम; फक्त ही एकच अट

‘तुतारीचा बादशहा’ हरपला; सोशल मीडियावर भावुक रीलमधून आठवणींना उजाळा

Pune Rain : कडक उन्हाळ्यात पुण्याला पावसानं झोडपलं, वादळी वारा, रस्त्यावर पाणी, वरून टपोऱ्या गारांचा तडाखा

Maharashtra Live News Update: भर पावसात अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेचे विविध समस्यांबाबत आंदोलन

Ashok Kharat: मंत्रालयातील IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बायका अशोक खरातकडे जायच्या, काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT