Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी सायबर कॅफे चालकांकडून लूट; जास्तीचे पैसे घेत असल्याचा आरोप

Nandurbar News : राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. यासाठी आवश्यक असलेल्या उत्पन्नाचा दाखल काढण्यासाठी तहसील कार्यालयात महिला व नागरिकांची प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : लाडकी बहीण योजना जाहीर झाल्याने दोन दिवसांपासून या योजनेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. मुळात अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांच्याकरून अर्ज मोफत भरण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र खासगी सायबर कॅफे चालकांकडून नागरिकांची लूट केली जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. अर्ज भरून देण्यासाठी जादा पैशांची आकारणी केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. यासाठी आवश्यक असलेल्या उत्पन्नाचा दाखल काढण्यासाठी तहसील कार्यालयात महिला व नागरिकांची प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरावयाचा असून याची सुरवात १ जुलैपासून करण्यात आली आहे. यामुळे कागदांची जुळवाजुळव करत लवकर अर्ज भरण्यासाठी काहीजण खासगी सायबर कॅफेवर जात आहेत. मात्र येथे नागरिकांची लूट केली जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात हा प्रकार समोर आला आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात सेतू केंद्रासह खाजगी सायबर कॅफेवर लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांचा पूर्ततेसाठी चांगलीच गर्दी होत आहे. याचाच फायदा घेत खाजगी सायबर कॅफे चालकांकडून नागरिकांची लूट केली जात असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहेत. उत्पन्नाचा दाखला २० रुपयांचा मात्र तो भरण्यासाठी चक्क ८० रुपये जास्तीने घेतले जात आहेत यासोबतच डोमासाईल सर्टिफिकेटसाठी दोनशे रुपये जास्तीचे दर आकारण्यात येत असून यात नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा आरोप नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Attack News : पाकिस्तानवर भीषण हल्ला; बलूचिस्तान-तालिबान्यांच्या हल्ल्यात १० सैनिकांचा मृत्यू

Lakshmi Puja Thali: देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आरतीच्या ताटात या वस्तू जरूर ठेवा

Maharashtra Live News Update : मुलीच्या छेडछाडनंतर डाचकुल पाडा परिसरात दोन गटांमध्ये झटापट

Solapur : पूरग्रस्थाची दिवाळी अंधारात; सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत

सौरमालेतील कोणत्या ग्रहावर दिवस सर्वात मोठा असतो?

SCROLL FOR NEXT