नंदुरबार : जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात पर्याप्त रस्ते नसल्याने येथील रहिवाशांना येणाऱ्या समस्यांचा पाढा न संपणारा आहे. येथील रहिवाशांना ॲम्बूलन्स बांबूलन्सचा वापर करावा लागतोय हे नित्याचेच झाले. मात्र यावर आठवीत शिकणाऱ्या प्रणव वडाळकर या विद्यार्थ्यांने मार्गदर्शक शिक्षकांच्या मदतीने यावर ड्रोन ॲम्बुलन्सचा (Ambulane) पर्याय सुचवलाय. राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत प्रणवने सादर केलेल्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. (nandurbar news Eighth standerd student realized the option of a drone ambulance)
नंदुरबार (Nandurbar) जिल्हा मानव निर्देशांकात विकासाच्या बाबतीत पिछाडीवर आहे. यामुळेच की काय जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी आकांक्षीत जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे. असे असले तरी जिल्हा निर्मितीच्या 24 वर्षानंतर अतिदुर्गम भागातील शेकडो पाड्यांपर्यंत रस्ते न पोहचल्याने येथील हजारो रहिवाशाना समस्यांचा सामना करावा लागतोय. यात प्रामुख्याने तोकड्या आरोप व्यवस्थेबाबत नेहमी प्रश्न उपस्थित होतात.
बाईक ॲम्बुलन्सचा प्रयोग फिस्कटला
पर्याप्त रस्त्यांअभावी या भागात ॲम्बूलन्स पोहचू शकत नसल्याने येथील रहिवासी बांबूलन्सचा वापर करताय. यामुळे बऱ्याचदा रुग्णालयात पोहचण्याआधी अनेकदा रुग्णांचा मृत्यू होतो. काही वेळेला गरोदर माता, सर्पदंश झालेले रुग्ण यांचा अनकेदा रस्तातच मृत्यू होतो. यामुळे गेल्यावर्षी बाईक ॲम्बुलन्स देण्यात आल्या. असे असले तरी याचा प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही. या भागात ग्राऊंड ॲम्बुलॅन्स सोयीची असली तरी रस्त्यांची दुरवस्थेमुळे तिच्या वापरावरही मर्यादा आल्या. फ्लोटींग ॲम्बुलॅन्स या नदी किनाऱ्यालगतच्या गावांपुरत्याच मर्यादीत राहिल्या आहेत.
ड्रोन ॲम्बुलन्स पर्याय ठरू शकतो
विविध प्रकारच्या ॲम्बुलॅन्सचा उपयोग या भागात फारसा प्रभावी नसल्याने सोलर पॉवर्ड ड्रोन ॲम्बुलॅन्स यावर पर्याय ठरु शकतो असे आठवीमधील प्रणव वडाळकर विद्यार्थ्यांने भारत सरकारद्वारे संचलित विज्ञान परिषदेत शास्त्रशुद्ध पद्धती ड्रोन ॲम्बुलन्स निर्मिती करून प्रकल्प सादर केला आहे. आता या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे. सातत्याने दुर्गम भागात रस्त्यांअभावी रुग्ण रुग्णालयात वेळेवर न पोहचल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना ऐकण्यात, पाहण्यात येत असल्याने नेमके यावर काय पर्याय सूचविता येईल असे सातत्याने विचार केल्यानंतर ड्रोन ॲम्बुलॅन्सचा पर्याय प्रभावी ठरु शकतो. असे मार्गदर्शक शिक्षक अविनाश भामरे यांनी सांगितले आहे यावर शासनाने देखील विचार करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
असा होवू शकतो उपयोग
नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात एक-ना-अनेक उपाययोजना करुनही त्या फोल ठरत आहेत. यामुळे आता येथील रहिवाशांना तात्काळ आरोग्य सेवा पुरविण्यासाठी ड्रोन ॲम्बुलन्सचा वापर प्रभावी ठरणार आहे. सदर ड्रोनच्या माध्यमातून रुग्णांना औषधी पोहचविणे, पिक फवारणी, वनक्षेत्रातील पशूंवर लक्ष ठेवणे, दुर्गम भागात कोरोना लसीकरणासाठी लस पोहचविणे, रुग्णांना वेळेवर रुग्णालयापर्यंत पोहचविणे, यात कॅमेरा असल्याने पूर परिस्थितीची पाहणी, नुकसानग्रस्त भागाची पाहणी, जमिन मोजमाप, तोरणमाळ परिसरात पर्यटनासाठीदेखील याचा उपयोग होवू शकतो त्यामुळे शासनाने ड्रोन ॲम्बुलन्स प्रकल्पाची गांभीर्याने दखल घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.