Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

सेंट्रल किचनची योजना संपुर्ण भारतात राबविण्याचा प्रयत्‍न; केंद्रीय आरोग्‍य मंत्री मांडवीया

सेंट्रल किचनची योजना संपुर्ण भारतात राबविण्याचा प्रयत्‍न; केंद्रीय आरोग्‍य मंत्री मांडवीया

दिनू गावित

नंदुरबार : सेन्ट्रल किचनच्या माध्यमाने आदिवासी विद्यार्थ्यांना सकस व ताजे अन्न पुरवठा करण्याची केंद्र सरकारच्या नीती आयोगची योजना आदिवासी भागासाठी लाभकारी ठरत आहे. शिवाय, विद्यार्थ्यांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यास महत्वाची भूमिका बजावते आहे. ही योजना संपूर्ण भारतात राबविली जाईल त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत असे आज केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी नंदुरबार (Nandurbar) येथील सेन्ट्रल किचनच्या पाहणी दरम्यान सांगितले. (nandurbar Efforts to implement Central Kitchen scheme across India Health Minister Mandviya)

श्री. मांडविया हे शनिवारपासून दोन दिवसाच्‍या नंदुरबार जिल्‍हा दौऱ्यावर असून त्यांनी आज सेन्ट्रल किचनची पाहणी केली. निवासी आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या आश्रम शाळेपर्यंत पुरवठा करण्यात येणारे अन्नातील पोषक घटकांची प्रयोगशाळेत तपासणी करून सकस, ताजे अन्न पुरेश्या प्रमाणात वेळेवर पोहोचावे यासाठी सेन्ट्रल किचन करीत असलेल्या प्रयत्नांचे श्री. मांडवीया यांनी कौतुक केले. यावेळी त्यांनी प्रयोग शाळेसह संपूर्ण सेन्ट्रल किचनची पाहणी करून अन्न पुरवठ्याची यंत्रणा जाणून घेतली. तर तयार अन्नाची चवही घेतली.

मंत्रींनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत असलेल्या आश्रम शाळेतील जवळपास दहा हजार पेक्षा अधिक मुलांना या सेंट्रल किचन शेडच्या माध्यमातून दोन वेळचे जेवण व सकाळ-संध्याकाळचा नाश्ता अशा आहाराचा पुरवठा केला जातो. मंत्री मांडवीया यांनी नंदुरबार शहरातील एकलव्य मॉडेल शासकीय आश्रम शाळेलाही (एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल) भेट दिली. विद्यार्थ्यांसोबत मंत्रीमहोदयांनी संवाद साधला. तसेच या ठिकाणी असलेल्या बौद्धिक कार्यशाळेच्या वर्गाला भेट देऊन कार्यशाळेत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांबद्दल माहिती जाणून घेतली. कोरोना युद्धात केंद्र सरकारने यशस्वी विजय प्राप्त केल्याने येथील विद्यार्थींनी मंत्रीमहोदयांना योद्धाचे चित्र भेट दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT