Nandubar News  Saam TV
महाराष्ट्र

Nandubar : भरधाव ट्रकचे अचानक ब्रेक फेल, थेट ५० फूट दरीत कोसळला, चालकाचा जागीच मृत्यू

नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात कांद्याने भरलेला ट्रकचा अपघात झाला. यात चालकाचा मृत्यू झाला तर सहचालक गंभीर जखमी झाला आहे.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

Nandurbar News : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात अपघाताची एक भीषण घटना घडली. नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात कांद्याने भरलेला ट्रकचा अपघात झाला. यात चालकाचा मृत्यू झाला तर सहचालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळ गाठून मदतकार्य सुरू केलं आहे. (Nandurbar News Today)

प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव कडून राजस्थानकडे कांदे भरून जात असलेला ट्रक (Truck) तीव्र उतारावर ब्रेक फेल होऊन अनियंत्रित झाल्याने ५० फुट खोल घाटात कोसळला. यात ट्रक डिव्हायडरचा तुटलेला भागाला ठोकला गेला. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूतील गावकरी मदतीला धावून आले. चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहचालक गंभीर जखमी झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी जेसीबीच्या सहाय्याने चालक व सहचालकला बाहेर काढले. परंतू यात चालकाचा मृत्यू झाला. पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी चरणमाळ घाटात अपघात दरम्यान लूट थांबवण्यासाठी ग्रामरक्षण समिती स्थापन केल्यानंतर या ठिकाणी कुठल्याही ट्रकची लूट होत नसल्याचे दिसून आले. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप पर्यंत घाटात अपघात होऊ नये, याबाबत ठोस उपाययोजना झालेली दिसून येत नाही. (Breaking Marathi News)

चरणमाळ घाट रस्ता दुरूस्तीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. चरणमाळ घाटात भविष्यात अपघात टाळण्यासाठी या मार्गावरून अवजड वाहने व खाजगी लक्झरी प्रवासी बस वाहतूक बंद करण्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणेही तेवढेच गरजेचे आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी घाटात गतिरोधक बसवले परंतु त्याचा काहीसा उपयोग होताना दिसून येत नाही. दुरुस्तीचा प्रस्तावाला देखील गती मिळत नसल्याने निष्पाप लोकांचा बळी जात आहे. चरणमाळ घाटातील अपघात सत्र कधी थांबेल असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : महाडनंतर रोह्यात वाद उफाळला; भाजप कार्यकर्त्याला मारहाण, VIDEO

Maharashtra Nagar Parishad Live : मतदानला शेवटचे काही मिनिटे शिल्लक असताना मतदारांची धावपळ

Mansi Naik Photos: हॉट अन् बोल्ड मानसी नाईक, फोटो पाहून घायाळ व्हाल

Modi Government: मोदी सरकारच्या प्रशासकीय रचनेत मोठे बदल; राजभवनांसह PMOचं नाव बदललं

मतदान केंद्राबाहेर छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी|VIDEO

SCROLL FOR NEXT