Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात अतिसाराची लागण; आरोग्य यंत्रणा १५ किलोमीटर पायी चालत पोहचली गावपाड्यांवर

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या गावपाड्यांवर अनेकांना अतिसाराची लागण झाली आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याचा अतिदुर्गम भागात असलेल्या झापी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या लहान गाव पाड्यांमध्ये अतिसाराचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. हा भाग अतिदुर्गम असल्याने या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते नसल्याने आरोग्य कर्मचारी १५ किलोमीटरची पायपीट करत पाड्यांवर पोहचले आहेत. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या गावपाड्यांवर अनेकांना अतिसाराची लागण झाली आहे. अनेकांना याचा त्रास होऊ लागल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला झाली. यानंतर आरोग्य यंत्रणेच्या (Health department) कर्मचाऱ्यांनी १५ किलोमीटर पायी प्रवास करत गावपाड्यांवर पोहचले. यानंतर येथे उपचार सुरु करण्यात आले आहेत. या दुर्गम भागात तात्पुरते आरोग्य केंद्र तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि औषधी बांबूची झोळी करून पोचवण्याचे काम करण्यात आले. 

अतिसाराची दोन बालकांचा मृत्यू?

सध्या या परिसरात १०० पेक्षा अधिक अतिसाराचे रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अतिसारामुळे दोन बालकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र आरोग्य विभागाच्या वतीने या संदर्भातली चौकशी केली जात आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अतिदुर्गम भागात तपासणी सुरू केली असून उपाययोजना केल्या जात आहे. दूषित पाण्यामुळे या भागात अतिसाराची लागन झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: वंचित बहुजन आघाडीकडून भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Lose Belly Fat : महागड्या डाएटशिवायही पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी, फक्त आठवडाभर करा 'हा' घरगुती उपाय

Abhijit Dipke Exclusive: भर मुलाखतीत अभिजीत दिपकेला अश्रू अनावर, मोदी सरकारच्या कोणत्या गोष्टीमुळे डोळ्यात आलं पाणी?

Rain Alert : भीमा-नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस; उजनी, वीर धरणांतून मोठा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

EPFO Update : PF धारकांसाठी मोठी खुशखबर! आता पीएफचे पैसे अवघ्या 2 दिवसांत खात्यात, UPI द्वारेही मिळणार रक्कम

SCROLL FOR NEXT