Farmer crop loan 
महाराष्ट्र

नंदुरबार जिल्‍ह्यात पीककर्जाचे केवळ ३८ टक्केच वाटप

शेतकऱ्यांना खत, बियाणे आणि इतर कृषि कामासाठी वेळेवर कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करावी. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यासाठी विशेष मोहिम राबवावी.

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : खरीप व रब्बी हंगामाच्या वार्षिक नियोजनाच्या तुलनेत नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे केवळ ३८ टक्केच वाटप झाले आहे. ही बाब आज (ता.२८) झालेल्‍या पीक कर्ज आढावा बैठकीत स्पष्ट झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बँकांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे आणि अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी बॅंक अधिकाऱ्यांना दिले. (nandurbar-news-collector-manisha-khatri-meet-districute-farmer-crop-loan)

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जयंत देशपांडे, नाबार्डचे प्रमोद पाटील, जिल्हा सहकार उपनिबंधक अशोक चाळक आदी उपस्थित होते.

जिल्‍हाधिकारी खत्री म्हणाल्या, पीककर्ज देण्यातील अडचणी दूर करव्यात. शेतकऱ्यांना खत, बियाणे आणि इतर कृषि कामासाठी वेळेवर कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करावी. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यासाठी विशेष मोहिम राबवावी. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची माहिती अधिकाधिक नागरिकांना देण्यात यावी. प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान जनधन खात्याद्वारे मिळविण्याच्या प्रक्रीयेत येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा. जिल्ह्यात बँक सखीच्या नेमणूकीसाठी आवश्यक कार्यवाही करावी. त्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

७०४ कोटीचे उद्दीष्‍ट

पीक कर्ज वाटपासह विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेतला. जिल्ह्याला खरीप हंगामासाठी ५६३ कोटी ५६ लक्ष तर रब्बी हंगामासाठी १४० कोटी ९२ लक्ष रुपयांचे उद्दीष्ट असून आतापर्यंत २६४ कोटी ८७ लक्ष रुपये अर्थात एकूण वार्षिक उद्दीष्टाच्या ३८ टक्के पीक कर्जाचे वितरण करण्यात आल्याची माहिती यावेळी दिली. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवनदायी योजना आणि मुद्रा कर्ज योजनेबाबत यावेळी आढावा घेतला. जिल्ह्याच्या पत आराखड्याचे प्रकाशन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CT Scan, MRI आणि X-Ray यांच्यात नेमका फरक काय?

Train Fire: धावत्या ट्रेनला भीषण आग, 4 डबे जळून खाक; प्रवाश्यांनी घाबरून खाली उड्या मारल्या

Maharashtra News Live Update: पुण्यात एमडी ड्रग्ज, तीन पिस्तुलांसह सात जणांना अटक

High Court : कौटुंबिक वाद म्हणजे क्रूरता नाही! हाय कोर्टाचा मोठा निर्णय

Eye Twitching Problem : डोळे अचानक का फडफडतात? यामागचं नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT