जळगाव : पीक विम्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने आणली. ज्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फायदा होवून त्यांना नुकसानीचा मोबदला मिळेल. परंतु, महाविकास आघाडी सरकारने योजनेतील निकष बदलविले. यामुळे शेतकऱ्यांना फायदा न होता विमा कंपन्यांना होत आहे. आता शेतकऱ्यांचा विषय आला की राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखविले. अर्थात आपला नाकरतेपणा झाकण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचा आरोप भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केला. (jalgaon-news-bjp-shetkari-sanwad-abhiyaan-vasudev-kale-press-and-crop-inshurance-issue)
भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव काळे हे राज्यव्यापी शेतकरी संवाद अभियान या कार्यक्रमासाठी उत्तर महाराष्ट्र विभाग दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते आज जळगावी आली असता भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत हेाते. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जि.प.सदस्य पोपट भोळे, सुरेश धनके आदी उपस्थीत होते.
काळे यांनी सांगितले, की भाजपच्यावतीने किसान मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेत आहे. त्यांना विविध योजनेच्या लाभासाठी येणाऱ्या अडचणी जाणून घेत आहोत. शिवाय, लाभाच्या योजनांबाबत माहिती दिली जात आहे.
राज्य सरकार शेतकरी विरोधी
महाराष्ट्रातील सरकार हे शेतकरी विरोधी आहे. राज्य सरकारकडून घेण्यात येत असलेले निर्णय शेतकरी विरोधी आहेत. पिक विम्याच्या बाबतीतील निर्णयही तसाच आहे. कारण निकष बदलविल्यामुळे १ कोटी ३८ जणांनी विमा भरला असताना केवळ १५ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला. जो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ८५ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.