bullock cart 
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांना सोडायला फुलांनी सजलेली बैलगाडी

विद्यार्थ्यांना सोडायला फुलांनी सजलेली बैलगाडी

दिनू गावित

नंदुरबार : दोन वर्षानंतर पहिली ते चौथीपर्यंतच्‍या शाळा आजपासून सुरू झाल्‍या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चक्‍क बैलगाडीत बसवून शाळेपर्यंत सोडण्यात आले. यानंतर जिल्हा परिषदेचे सीईओ रघुनाथ गावडे व शिक्षणाधिकारी राहुल चौधरी यांनी विद्यार्थ्यांना पुष्प देऊन प्रवेशद्वाराजवळ स्वागत केले.

कोरोनामुळे शाळा बंद असल्‍याने शाळांचे आवार मुलांविना सुरे होते. अनेक दिवसानंतर शाळेचा आवार आज मुलांच्‍या किलबिलाटाने बहरला. तत्‍पुर्वी शाळा सुरू होणार असल्‍याने शाळेची देखील तयारी केलेली होती. कधी नव्‍हे ते मुले शाळेत येत असल्‍याने त्‍यांचे स्‍वागत प्रत्‍येक शाळेत झाले. परंतु, विद्याथ्‍र्यांना सोडायला बैलगाडीच आली हे अनोखे चित्र देखील आज पहायला मिळाले.

फुलांनी सजलेली बैलगाडी

नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण भागातील शाळा आजपासुन सुरु झाल्या असुन, विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये वाजत गाजत पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या खोडसगाव येथील शाळेत खास बैलगाडी सजवुन विद्यार्थ्यांना त्यात बसवुन त्यांना शाळेपर्यत आणण्यात आले. यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व शिक्षणाधिकारी राहुल चौधरी यांनी बालकांना पुष्प देवुन त्यांचे शाळेत स्वागत केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : प्रति तोळा ७ हजारांनी सोनं झालं स्वस्त, चार दिवसात मार्केटमध्ये घसरण, वाचा नवे दर काय?

फडणवीसांच्या फलटण दौऱ्याआधी मोठी घडामोड; डॉक्टर आत्महत्या प्रकरणात दोन्ही आरोपींना बेड्या

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

Diabetes Symptoms: सतत भूक लागते अन् थकवाही जाणवतोय? ही लक्षणे असू शकतात डायबिटीजची

Jio Cheapest Plan: जिओचा स्वस्तात मस्त प्लॅन, दररोज २ जीबी डेटा अन् बरंच काही...

SCROLL FOR NEXT