Nandurbar BJP Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar BJP : नंदुरबार भाजपचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; जिल्हाध्यक्षांना पदावरून हटविण्याची मागणी

Nandurbar News : भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी प्रदेश भाजपाचे सरचिटणीस विजय चौधरी आणि जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांची तक्रार कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यात भाजपचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी सरचिटणीस व जिल्हाध्यक्ष यांची तक्रार वरिष्ठ स्तरावर केली असून त्यांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला वाद उफाळून आला आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील भाजप अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यात असलेला अंतर्गत वाद समोर आला आहे. यामध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी प्रदेश भाजपाचे सरचिटणीस विजय चौधरी आणि जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांची तक्रार कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. वरिष्ठ स्तरावर याची दखल घेतली जाते कि त्यांच्यातील वाद मिटविला जाईल; हे पाहणे मागत्वाचे असणार आहे. 

विश्वासात घेत नसल्याचा आरोप 

भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी आणि जिल्हाध्यक्ष निलेश माळी मनमानीने कारभार करत असून, कोणालाही विश्वासात घेत नाही. भाजपाचे जुने कार्यकर्त्यांना डावलून नवीन पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांना पद देत आहेत. त्यामुळे जुने कार्यकर्ते दुखावले जात जात असल्याने राजेंद्र गावित यांनी भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र दिलं असून या पत्रात भाजपाचे सरचिटणीस आणि जिल्हाध्यक्ष यांना पदावरून काढण्यात यावे अशी मागणी केली आहे.  

भाजपचे नवीन व जुने दोन गट 

भाजपातील अंतर्गत वाद वाढला असल्याचे दिसून येत आहेत. जिल्ह्यात सध्या नवीन भाजप आणि जुनी भाजप असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे आपापसातला वाद आता थेट कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे गेला आहे. त्यामुळे चव्हाण यावर काय कारवाई करणार हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Shirdi : साईनगरी शिर्डीला जाताय? मुंबईहून कमी खर्चात 'या' सोप्या मार्गाने करा प्रवास

Maharashtra News Live Update : कल्याण बुद्धभूमी फाऊंडेशन प्रकरण; बुद्धभूमीकडून १५ जूनपासून बेमुदत धरणे आंदोलनाची घोषणा

खुशखबर! लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट समोर

Mumbai Women's T20 League: सोबो मुंबई फाल्कन्सच्या महिलांनी रचला इतिहास, पहिल्याच मुंबई लीगमध्ये शानदार विजेतेपदाचा मान

आता १८ वर्षावरील व्यक्तीला आधार कार्ड नाहीच; 'या' राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT