Samruddhi Highway : समृद्धी महामार्गासाठी भूसंपादित जमिनीचा मोबदला मिळेना; शेतकऱ्यांचे महामार्गावर आंदोलन 

Shahapur News : शहापूर तालुक्यातील अंदाड गावातील ७ शेतकऱ्यांच्या मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेत जमीनी भूसंपादन केले गेले. अद्याप मोबदला न मिळाल्याने अंदाड गावातील शेतकरी आजपर्यंत मोबदल्यासाठी फेऱ्या मारत होते
Samruddhi Highway
Samruddhi HighwaySaam tv
Published On

फैय्याज शेख 
शहापूर
: मुंबई- नागपूर हा समृद्धी महामार्ग तयार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. जमीनी गेल्या परंतु त्याचा मोबदला अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही. मोबदला न मिळाल्याने महीला शेतकरी आज समृद्धी महामार्गावर आत्मदहन करणार असून मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. 

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अंदाड गावातील ७ शेतकऱ्यांच्या मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेत जमीनी भूसंपादन केले गेले. मात्र अद्याप ही मोबदला न मिळाल्याने अंदाड गावातील शेतकरी आजपर्यंत मोबदल्यासाठी फेऱ्या मारत होते. यात दोन शेतकरी सरकारी दरबारात फेऱ्या मारून त्यांचा मृत्यू झाला. मात्र शेतकऱ्यांची फरफट थांबलेली नाही. 

Samruddhi Highway
Gold Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा आजचे दर

आत्मदहनाचा दिला होता इशारा 

शेत जमीनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी पत्रव्यवहार करून शासकीय अधिकारी व मंत्री यांच्याकडे हेलपाटे मारले. मात्र अद्यापही मोबदला मिळाला नाही. म्हणून अखेर या सात शेतकऱ्यांनी एकत्र येत ज्या ठिकाणची शेत जमीन भूसंपादन केली गेली आहे. त्या ठिकाणी आत्मदहन करण्याचा इशारा देत तसे पत्रव्यवहार तहसिलदार कार्यालयात केले आहे. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस फाटा तैनात करण्यात आले आहे.

Samruddhi Highway
Washim : लिंबू म्हणून दिलेली रोपं ईडलिंबूची; समितीच्या अहवालतून स्पष्ट, कृषी केंद्राकडून फसवणूक

शेतकऱ्यांचे आंदोलनाला सुरवात 

दरम्यान जमीनीचा मोबदला न मिळाल्याने महीला शेतकरी यांचा मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावर आत्मदहन करण्याचा इशारा तहसीलदार कार्यालया पत्रव्यवहार केला आहे. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावर आंदोलनाला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com