Nandurbar Crime Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Crime : बँक मॅनेजरच निघाला चोर; सेंट्रल बँकेत केला तीन लाखांचा अपहार

Nandurbar News : शाखा व्यवस्थापक पदाचा गैरवापर करून प्रवीण गेडाम याने १९ जुलै २०१९ ते १५ एप्रिल २०२३ दरम्यान बँकेच्या खात्यातील रक्कमेत अपहार करत रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : बँक शाखेतील एका खात्यातून तीन लाख १० हजारांची रक्कम विविध बँकेच्या खात्यात वर्ग करीत शाखा व्यवस्थापकाने फसवणूक केल्याची घटना धडगाव शहरात घडली आहे. याप्रकरणी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा राजबर्डीच्या निलंबित व्यवस्थापका विरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

वर्धा जिल्ह्यातील गिरड येथील प्रवीण लक्ष्मण गेडाम याची धडगाव तालुक्यातील राजबर्डी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या शाखेच्या शाखा व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. परंतु शाखा व्यवस्थापक पदाचा गैरवापर करून प्रवीण गेडाम याने १९ जुलै २०१९ ते १५ एप्रिल २०२३ दरम्यान शाखा व्यवस्थापक प्रवीण गेडाम याने बँकेच्या खात्यातील रक्कमेत अपहार करत रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. 

विविध बँकेच्या खात्यात वर्ग केली रक्कम 

प्रवीण गेडाम याने बँक खात्यातील स्टाप तीन क्लब राजबर्डी यांच्या नावे असलेल्या खात्यातून तीन लाख दहा हजार रुपयांची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी विविध बँकेच्या खात्यात वर्ग केली. तसेच बँकेची फसवणूक करून रक्कम काढून घेत अपहार केला. सदर अपहार झाल्याचा प्रकार नवीन आलेल्या शाखा व्यवस्थापकाच्या लक्षात आला. यानंतर याची चौकशी केली असता गेडाम याने हा अपहार केल्याचे लक्षात आले. 

गेडाम विरोधात पोलिसात गुन्हा दाखल 

दरम्यान या प्रकरणी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा राजबर्डीच्या मॅनेजर चंद्रशेखर सुरेश महाजन यांनी धडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निलंबित व्यवस्थापक प्रवीण लक्ष्मण गेडाम यांच्याविरुद्ध कलम 49 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT