railway travling Saam TV
महाराष्ट्र

रेल्वे प्रवासात आई-बाळासाठी बेबी बर्थ; शिक्षक व पत्नीने केले संशोधन..

रेल्वे प्रवासात आई-बाळासाठी बेबी बर्थ; शिक्षक व पत्नीने केले संशोधन..

दिनू गावित

नंदुरबार : शहरातील श्राफ हायस्कूलच्या भौतिकशास्त्र विषयाचे शिक्षक नितीन देवरे व त्यांच्या पत्नी हर्षली देवरे यांनी रेल्वे प्रवास करताना आई व लहान बाळाला झोपण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध व्हावी यासाठी फोल्डेबल बेबी बर्थचे संशोधन केले आहे. अगदी कमी खर्चात तयार केलेल्या बेबी बर्थचा या दाम्पत्याने भारतीय रेल्वेला सादरीकरण करून अंमलात आणण्याची विनंती केली आहे. (nandurbar-news-Baby-berth-for-mother-baby-on-train-journey-Research-done-by-teacher-and-wife)

रेल्वेतून प्रवास करताना सर्वच श्रेणीच्या बोगीमध्ये लहान बाळ असलेल्या महिलांचा प्रवास जिकिरीचा ठरतो. बेबी बर्थची व्यवस्था नसल्याने एकाच सीटवर अडखळत बाळ व आईला झोपावे लागते. त्यामुळे आई व बाळाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. रात्रभर आई व बाळाला अडखळत झोपावे लागते. त्यामुळे दोघांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते हानीकारक ठरते. अशा वेळी फोल्डेबल बेबी बर्थ हा यावरील उपाय ठरू शकतो.

बेबी बर्थचे रेल्वेला सादरीकरण

नितीन देवरे हे नंदुरबार शहरातील श्राफ हायस्कूलमध्ये भौतिकशास्त्र विषयाचे शिक्षक असून विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या संशोधनाच्या प्रदर्शनासाठी नेहमी बाहेर जावे लागते. दोन वर्षांपूर्वी एका प्रदर्शनासाठी त्यांना परिवारासोबत जावे लागले असताना त्यांचे लहान बाळ असल्याने त्यांना रेल्वे प्रवासादरम्यान बाळाला झोपवण्यासाठी आलेल्या अडचणीनंतर कोरोना लाॅकडाऊन दरम्यान त्यांनी रेल्वे प्रवास करताना बाळाला झोपवण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण बेबी बर्थचे संशोधन सुरू केले होते. त्यात देवरे दांपत्यांना यश आले. बेबी बर्थच्या निर्मितीनंतर भारतीय रेल्वेला देखील त्यांनी सादरीकरण केले आहे. जवळपास पाचशे ते एक हजार रुपये दरम्यान खर्च असलेल्या बेबी बर्थच्या संशोधनावर स्वतःचे नाव कोरले जावे यासाठी शिक्षक नितीन देवरे व त्यांच्या पत्नी हर्षाली देवरे यांनी यासंबंधीचे संशोधन करीत पेटंट मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. (देवरेज फोल्डेबल बेबी बर्थ) या नावाने नुकतेच इंडियन पेटंट जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

बेबी बर्थचे वैशिष्ट्ये

फोल्डेबल बेबी बर्थ हा ७६ सेंमी बाय २३ सेंमी साइजचा आहे. बेबी बर्थ १० ते १२ किलोपर्यंत वजन पेलू शकतो. यामध्ये कंपोझीट लॉकिंग यंत्रणा वापरली गेली आहे. रेल्वेत सध्या अस्तित्वात असलेल्या लोअर बर्थमध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही. झोपेत बाळ खाली पडू नये म्हणून संरक्षक बेल्टची सोय. मुख्य म्हणजे रेल्वे कोचमध्ये इतरांना अडथळा होणार नाही अशा प्रकारे बर्थची रचना आहे. बर्थची रचना बाळाला दुखापत होणार नाही या प्रकारे बनवलेली आहे. रेल्वेतील सध्या अस्तित्वात असलेल्या लोअर बर्थला जर हा फोल्डेबल बेबी बर्थ जोडला तर बाळ या बर्थवर झोपू शकते. अर्थात लोअर बर्थ आईला झोपण्यासाठी पूर्णपणे मोकळा असेल.

रेल्वेला विनामूल्य हस्तांतरणाची तयारी

रेल्वेतील सद्या परिस्थितीत लोअर बर्थचा विचार करून फोल्डेबल बेबी बर्थ तयार करण्याचा प्रयत्न देवरे दाम्पत्याने केला आहे. सदर फोल्डेबल बेडची भारतीय रेल्वेने आपल्या पद्धतीने सुधारणा करून किमान एका बोगीमध्ये एक बेबी बर्थ प्रत्यक्षपणे अस्तित्वात आणावे. ही या दाम्पत्याची अपेक्षा आहे. सदर संशोधनाला देवरेज फोल्डेबल बेबी बर्थ असं नाव दिलं आहे. हे संशोधन भारतीय रेल्वेला विनामूल्य हस्तांतरित करण्यास तयार असल्याचे देवरे दांपत्याने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

SCROLL FOR NEXT