अनाकलनीय ! वानरांकडून महिन्यभारत तब्बल शेकडो कुत्र्यांच्या पिलांची हत्या

उंचावर घेऊन जात देत आहेत फेकून, बीडच्या माजलगावमध्ये नागरिक दहशतीखाली...
अनाकलनीय ! वानरांकडून महिन्यभारत तब्बल शेकडो कुत्र्यांच्या पिलांची हत्या
अनाकलनीय ! वानरांकडून महिन्यभारत तब्बल शेकडो कुत्र्यांच्या पिलांची हत्याविनोद जिरे
Published On

विनोद जिरे

बीड : कुत्र्याच्या पिल्लांना (Puppies) उंचावर नेऊन फेकणाऱ्या वानरांनी, एक दोन नव्हे तर तब्बल गावातील 100 ते 200 पिल्याचा बळी घेतल्याने खळबळ उडाली आहे. बीडच्या (Beed) माजलगाव तालुक्यात असणाऱ्या लवुळ येथे, मागील एक महिन्यापासून वानरांनी (Monkeys) धुमाकूळ घातला आहे. गावात कुत्र्याचे लहान पिल्लू दिसले की वानर त्यास उचलून घेऊन जात, उंच ठिकाणावरुन खाली फेकून देत त्यांचा जीव घेत आहेत. (Monkeys throwing Puppies away)

हे देखील पहा-

माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या लवुळ या 5 हजार लोकसंख्याच्या गावात मागील दीड ते दोन महिन्यापासून तिन वानरांचा वावर आहे. हे वानरं मागील एक महिन्यापासून गावात असलेल्या कुत्र्यांची पिल्लं उचलून घेऊन जात आहेत. त्यानंतर पिलांना घेऊन उंच झाडावर किंवा घरावर जात तेथून फेकून देत आहेत. उंचावरून पडल्याने पिलांचा लागलीच मृत्यू होत आहे. आतापर्यंत या वानरांनी 100- 200 पेक्षा जास्त कुत्र्यांच्या पिलाचा बळी घेतला असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

याच गावातील सिताराम नायबळ यांच्या कुत्र्याच्या पिल्लाला, 15 दिवसापूर्वी वानर घेऊन गेले होते. हे पिल्लू ओरडत असल्याने सिताराम नायबळ हे गच्चीवर जाऊन पिलाला सोडवण्याचा प्रयत्न करत असताना, वानर त्यांच्या अंगावर धावून आले असता सीताराम नायबळ हे पळत असताना गच्ची वरून खाली पडले. त्यात त्यांचा पाय मोडला. त्यांच्यावर मागील पंधरा दिवसांपासून उपचार सुरू होते. याचबरोबर अनेक जण जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.   

अनाकलनीय ! वानरांकडून महिन्यभारत तब्बल शेकडो कुत्र्यांच्या पिलांची हत्या
रायगड: जिल्हा सायबर गुन्हेमुक्त करण्यासाठी पोलिसांचा 'मास्टर प्लॅन'

याबाबत येथील ग्रामपंचायतीने धारूर येथील वनविभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क केला असता ते केवळ एक दिवस आले व थोडावेळ त्या वानरास पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांना ते वानर पकडता न आल्याने ते निघून गेले. त्यानंतर ते इकडे फिरकले देखील नाही. यामुळे लवुळकरांचा वनविभागाच्या अधिका-यांच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. लवकरात लवकर या वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकरी करत आहेत

विशेष म्हणजे आत्तापर्यंत गावातील शेकडो कुत्र्याच्या पिल्लांना उंचावर नेऊन फेकून ठार मारल्याने गावात दहशत माजली आहे. तसेच लहान मुलांना बाहेर खेळायला जाऊ देत नाही.यामुळे नागरिकामध्ये दहशत निर्माण झाली आहे. वानर अशा प्रकारे का कुत्र्याच्या पिलांचा जीव का घेत आहेत ? याच कारण उलगडले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com