Nandurbar Accident News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Accident News: भीषण अपघात; ट्रक-छोटा हत्तीची समोरासमोर धडक; ३ ठार, २ जखमी

Nandurbar Accident News : ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक झाली.

साम टिव्ही ब्युरो

प्रकाशा (नंदुरबार) : प्रकाशा गावाजवळ ट्रक व छोटा हत्ती गाडीत समोरासमोर जोरदार धडक होऊन तीन जण (Prakasha) जागीच ठार झाले. अपघातातील वृद्ध व दहा वर्षीय मुलाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. रविवारी (ता. ७) पहाटे साडेपाचच्या सुमारास हा (Accident) अपघात झाला. (Live Marathi News)

प्रकाशा (ता. शहादा) जवळ अंकलेश्वर- बऱ्हाणपूर महामार्गावरील राजाराम सुपडू चौधरी यांच्या शेताजवळ शहाद्याहून प्रकाशाकडे येणारा छोटा हत्ती व प्रकाशाकडून शहाद्याकडे जाणारा ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली.

त्यात हेमराज अंजनेय हरिजन (वय ३९), मनोज बोखारभाई दाठिया (४२, साईमोहन सोसायटी, बेस्तान, सुरत, गुजरात), तर चालक भगवान गोविंदभाई पंचुले (४८, रा. सचिन गाव, सुरत) तिघे जागीच ठार झाले. गोलूभाई (६५) व अंतिम (१०, पूर्ण नाव, पत्ता समजू शकला नाही) हे जखमी झाले असून, उपचारासाठी जिल्हा (Hospital) रुग्णालयात रवाना केले. माहिती कळताच घटनास्थळी पोलिसांसह नागरिकानी धाव घेतली.

जेसीबीच्‍या सहाय्याने काढले बाहेर

या धडकेत दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. अपघाताची भीषणता एवढी होती, की मृतांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी मागवावे लागले. पोलिस कर्मचारी तत्काळ दाखल झाल्याने जखमींचा जीव वाचविण्यात यश आले.

दरम्यान, जिल्हा पोलिसप्रमुख पी. आर. पाटील, अपर अधीक्षक नीलेश तांबे, पोलिस उपअधीक्षक संभाजी सावंत, प्रभारी पोलिस निरीक्षक राजन मोरे यांनी घटनास्थळाची पाहणी करत तत्काळ कारवाईचे आदेश दिले. जमादार मेहरसिंग वळवी, हवालदार रामा वळवी, संदीप खंदारे, कृष्णा जाधव यांनी पंचनामा केला. ट्रकचालकाविरुद्ध शहादा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस उपनिरीक्षक अभिजित अहिरे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer’s Daughter : शेतकरी बापाने आयुष्य संपवलं; लेकीचं पोलीस होण्याचं स्वप्न, महाराष्ट्र पोलीस मदतीला धावले

Kolhapur-Satara Highway: सातारा -कोल्हापूर महामार्गवरील वाहतूक कोंडी फुटणार ; सरकारचा काय आहे प्लान?

Maharashtra Live News Update: राजन पाटलांनी दिला सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

धक्कादायक! धावत्या बसमधून महिलेची उडी; चाकाखाली येताच डोक्याचा झाला चेंदामेंदा

Maharashtra Politics : पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप; 4 बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश, निवडणुकीत समीकरण बदलणार

SCROLL FOR NEXT