Nandurbar Accident Saamtv
महाराष्ट्र

Nandurbar Accident: मजुरांना घेवून जाणाऱ्या जीपचा भीषण अपघात! एकाचा मृत्यू; १५ जण जखमी

Accident News: जखमींमधील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

Gangappa Pujari

सागर निकवाडे, प्रतिनिधी...

Taloda Accident News: नंदूरबारमधून एक दुर्देवी अपघाताची घटना समोर आली आहे. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यात मजुरांना घेवून जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Accident News)

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबारच्या (Nandurbar) तळोदा तालुक्यात एक जीव मजुरांना घेवून निघाली होती. ही गाडी प्रतापपुर गावाजवळ आली असता अचानक रॉड तुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप पलटी झाली.

या अपघातात (Accident) एकाचा जागीच मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले आहेत. जखमींमधील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. सर्वांवर तळोदा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातात जीप पलटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

हरियाणात भीषण बस अपघात...

 महाराष्ट्रासहित देशभरात अपघातांच्या मालिका सुरूच आहे. हरियाणातही भीषण अपघात झाला आहे. हरियाणाच्या जींद जिल्ह्यात बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. हरियाणाच्या भिवानी रोड येथील बीबीपूर गावाजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव वापरून 30 लाखांची खंडणी; मुंबई पोलिसांची कारवाई,चौघांच्या मुसक्या आवळल्या

अंबानींना मोठा दणका! मुंबईतील 3 हजार कोटीच्या घरावर ईडीची जप्ती; देशात खळबळ

Maharashtra Live News Update: धुळ्यातील लोणखेडी फाट्याजवळ चारचाकी आणि दुचाकीचा अपघात

Haryana: धक्कादायक! सचिवालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत IAS अधिकाऱ्याच्या सचिवाने संपवलं जीवन

Celebrity Health: वाढदिवसाच्या दिवशी प्रसिद्ध दिग्दर्शकाला हार्ट अटॅक? रुग्णालयात दाखल; नेमकं सत्य काय?

SCROLL FOR NEXT