Maharashtra Politics : नीलम गोऱ्हेंवर संजय राऊतांची टीका, दीपक केसरकरांनी सुनावले; म्हणाले, शरद पवारांनी...

Deepak Kesarkar on Sanjay Raut : नीलम गोऱ्हेंनी ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे शिंदे गटाकडून संजय राऊतांवर टीका होत आहे.
Sanjay Raut And Deepak Kesarkar
Sanjay Raut And Deepak KesarkarSaam Tv
Published On

Deepak Kesarkar Slams On Sanjay Raut : शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 'जय महाराष्ट्र' करत शिवसेना (शिंदे गट) प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. या टीकेला मंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शिंदे गटात प्रवेश केला. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातो. नीलम गोऱ्हेंनी ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर आज, शनिवारी संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे शिंदे गटाकडून संजय राऊतांवर टीका होत आहे. दीपक केसरकर यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला. नीलम गोऱ्हे या सुशिक्षित महिला आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात त्यांचा मोठा वाटा आहे. शिवसेनेत (शिंदे गट) आल्याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत करतो. त्यांच्यामुळे आमची ताकद वाढली, असे केसरकर म्हणाले. (Political News)

Sanjay Raut And Deepak Kesarkar
Sharad Pawar News: मै फायर हूँ.. बंडखोरी करणारे सगळे पराभूत होतील; नाशिकमधून शरद पवारांचा हल्लाबोल

यावेळी त्यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) निशाणा साधला. संजय राऊतांच्या या अशा बोलण्याने महाराष्ट्राला लाज वाटते. मी कधीच कोणाला काहीच वाईट बोलत नाही. एखाद्याबद्दल वाईट बोलणे, शिवराळ भाषा वापरणे आणि थुंकणे हे याआधी महाराष्ट्रात कधीच नव्हतं. ते बाळासाहेबाचे कार्यकर्ते होते. पण आता शरद पवारांसाठी (Sharad Pawar) काम करतात. शरद पवारांनी त्यांना जरा सल्ला द्यावा, असा टोला केसरकरांनी लगावला.

शिंदे गटातील आमदारांना बजावलेल्या अपात्रतेच्या नोटिशीवरही त्यांनी भाष्य केले. मला अद्याप कोणतीही नोटीस आली नाही. तुम्ही सांगता तर अशा नोटीस पाठवल्या असतील, असं केसरकर म्हणाले. आमची बाजू सत्याची आहे. आमचा विजय होईल. आम्ही नोटिसांना व्यवस्थित उत्तर देऊ. अध्यक्ष योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Sanjay Raut And Deepak Kesarkar
Modi Govt Cabinet Expansion: मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाचा होणार विस्तार, शिंदे आणि अजित पवार गटाला मिळणार मंत्रिपदे?

...याची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील - केसरकर

दीपक केसरकर यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवरही (Uddhav Thackeray) नेम साधला. मला सगळ्या शिवसैनिकांना सांगायचं आहे की बाळासाहेबांनी तयार करून घेतलेली घटना उद्धव ठाकरे यांनी बदलली. ही घटना बदलल्यानंतर निवडणूक आयोगाला कळवलं देखील नाही. सुनावणी सुरू आहे. ते निर्णय देतील, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे दौरा करतील तेव्हा नागरिकांनी विचारावं की तुम्ही अडीच वर्षे काय केलं? पंतप्रधान मोदींनी लस पाठवली आणि त्यांच्यामुळे जीव वाचले असे ते लोकांना सांगत नाहीत, असंही ते म्हणाले.

मुंबईतील कथित जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणावरूनही त्यांनी टीकास्त्र सोडलं. कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार केला, कंत्राटे तुमच्याच माणसांना दिली गेली. संजय राऊत यांच्या जवळच्यांची नावं आहेत, असा आरोप करतानाच कोविड सेंटरमध्ये ६३ टक्के बोगस डॉक्टर कसे आले? लोकांचा जीव स्वस्त झाला काय? असे सवालही त्यांनी केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com