Accident
Accident Saam tv
महाराष्ट्र

बसचा एक्सेल तुटल्याने ब्रेक निकामी; चरणमाळ घाटात अपघात

दिनू गावित

नंदुरबार : गुजरात परिवहन विभागाची एसटी बस मालेगावहुन सुरतला जात असताना महाराष्ट्र गुजरात (Gujrat) सीमेवरील चरणमाळ घाटात बसच्या पुढच्या चाकांचा एक्सेल तुटल्याने ब्रेक निकामी झाल्याने अपघात (Accident) झाला. चालकाच्या प्रसंगावधानाने ब्रेक निकामी झाल्यानंतरही बसवरील ताबा न सोडता रस्त्याच्या कडेला बस उभी करण्याचा प्रयत्न केल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. (nandurbar news Accident in Charanmal Ghat Brake failure due to broken axle of the bus)

मालेगावहुन (Malegaon) सुरतला जाणाऱ्या या बसमध्ये एकूण 28 प्रवासी होते. जवळपास 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नवापूर (Navapur) उपजिल्हा ग्रामीण (Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक बोरझर गावातील नागरिक व रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी बस अपघातमधील प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी पाठवण्यात मोठी मदत केली.

घाट रस्ता असूनही कठडे नाही

चरणमाळ घाट रस्ता तीव्र उताराचा असल्याने वारंवार अपघात होत असल्याने तीव्र उताराच्या वळणावर कठडे तयार करावे तसेच घाटात पोलीस चौकी उभारावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Second Hand Bikes: सेकंड हँड बाईक खरेदी करण्यापूर्वी कोणती घ्यावी खबरदारी?

Online Fraud : पिझ्झा फ्रेंचायसी देण्याचे कारण सांगत साडेअकरा लाखांत फसवणूक

Today's Marathi News Live: बीडच्या नांदूरघाट येथील दगडफेक प्रकरणी 321 जणांवर गुन्हा दाखल

Benifits of Vegetables: फळं आणि भाज्या खाल्यामुळे होणारे फायदे जाणून घ्या

Pankaj Jha Accused Actor Pankaj Tripathi : 'स्ट्रगलचा ढोल बडवणारे...', 'पंचायत'मधील आमदाराचा पंकज त्रिपाठींवर निशाणा

SCROLL FOR NEXT