अब्‍दुल सत्‍तार
अब्‍दुल सत्‍तार 
महाराष्ट्र

शासन कर्ज काढेल पण शेतकऱ्यांना मदत करणार : अब्‍दुल सत्‍तार

दिनू गावित

नंदुरबार : अतिवृष्‍टीमुळे सर्वत्र मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्‍त शेतकरीला शासनाच्या नियमानुसार मदत देऊ. वेळ पडल्यास शासन कर्ज काढेल पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार; असे आश्‍वासन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले. (nandurbar-news-Abdul-Sattar-statement-farmer-Government-will-take-out-loans-but-will-help-farmers)

शिवसेनेचे नंदुरबार संपर्कमंत्री व राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार आज नंदुरबार मध्ये दाखल झाले होते. त्यांनी आज कोपरली, कोळदा व भालेर येथील शिवसेना उमेदवारांच्या प्रचार सभा घेतल्या. कोपर्ली गटातील राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रचार सभेदरम्यान त्यांनी उपस्थितांना संबोधित करून शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे मतदारांना आव्हान केले.

भरपाईसंदर्भात चार– पाच दिवसात निर्णय

दरम्यान गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रासह नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत मिळावी; याबद्दल विचारले असता त्यांनी शासनाच्या नियमानुसारच शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार प्रयत्नशील आहे. त्यांनी तसे आदेश दिले असून गरज पडल्यास शासन कर्ज काढून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करेल. पुढील चार ते पाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी निर्णय घेतला जाईल. एकट्या मराठवाड्यात वीस लाख हेक्टरवरील पीकांच्या नुकसानीचा अंदाज असून महसूल राज्यमंत्री या निमित्ताने मदत लवकर कशी देता येईल याकडे लक्ष देऊन असल्याचे त्यांनी सांगितले.

ईडीची नोटीस म्हणजे एन.सी.

दरम्यान मंत्री अब्दुल सत्तार यांना ईडीच्या नोटीस बद्दल विचारले असता त्यांनी ईडीची नोटीस म्हणजे पोलिस स्टेशनमधील एन.सी. प्रमाणे झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ईडीचा दुरुपयोग करु नये अशी विनंती केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal gets interim bail: अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन

Audi Q3: आकर्षक लूक अन् जबरदस्त फीचरसह क्‍यू३ आणि ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅक बोल्‍ड एडिशन लाँच

Dhule Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघात गृह मतदानासाठी उदंड प्रतिसाद, 432 मतदारांनी बजावला हक्क

Sharad Pawar News | मोदींची ऑफर! शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया!

Lok Sabha Election : मतदानासाठी १२५५ वाहनांची व्यवस्था; ३५२ बससाठी मोजले ८८ लाख रुपये

SCROLL FOR NEXT