Nandurbar News
Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

गावाबाहेर येत ग्रामस्‍थांनी केले सामूहिक जेवण; पावसासाठी निसर्ग देवतांची पूजा

दिनू गावित

नंदुरबार : जुलै महिना सुरु झाला तरी नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पेरण्या कोळंबल्या आहेत. तसेच काही प्रमाणात पेरण्या झालेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. दमदार पाऊस (Rain) पडावा यासाठी धानोरा गावातील सर्व ग्रामस्थांनी गावात चूल न पेटवता गावशिवाराच्या बाहेर जावून निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाची पूजा करून गावाबाहेरच स्वयंपाक करुन (Nandurbar News) सामूहिक भोजन केले. यावेळी चांगला पाऊस पडावा यासाठी वरून राजाकडे साकडे घालण्यात आले. (nandurbar news aadivasi villagers Worship of nature deities for rain)

नंदूरबार (Nandurbar) तालुक्यातील धानोरा येथे पावसाने पाठ फिरवल्यामुळे दुबार पेरणीचे संकट उदभवल्यामुळे शेतकरी (Farmer) हवालदील झाला आहे. चांगला पाऊस यावा म्हणून गावकऱ्यांमार्फत देवाला साकडे घालण्यासाठी मारूती मंदिरात रात्रभर भजन कीर्तन करण्यात आले. सकाळी संपूर्ण शिवबंदी (गावबंद) करुन शेतात किंवा शिवाराच्या बाहेर जाऊन भोजन करण्यात आले. मारुती मंदिराजवळ सर्व ग्रामस्थ जमा होऊन परंपरेनुसार ढोल हे पारंपारिक वाद्यांचा गजराने आदिवासी नृत्याची जोड धरून अबाल-वृध्दांनी ‘धोंड्या धोंड्या पाणी दे, साय माय पिकू दे’ म्हणत वरुण देवाला साकडे घातले.

बेडकाचे लावले लग्‍न

गावशिवाराच्या बाहेर जाऊन तेथे निसर्गाची पुजा पुजारी करणसिंग वसावे, वासु वसावे यांनी केली. तेथे बेडकाचे लग्न लावण्यात आले. तेथे उपस्थित लोकांनी निसर्गाची पुजा करुन सर्वांना प्रसाद देण्यात आला. लहान मुलींनी डोक्यावर घागर घेऊन पाणी मागितले. पारंपारिक पद्धतीने देवाला साकडे घालण्यात आले व मारुतीला नदीचा गाळ लावण्यात आला व तुझ्या आंघोळीसाठी तर पाऊस पाड अशी विनंती करण्यात आली. यावेळी सरपंच मनोज पाडवी, उपसरपंच मनोहर वसावे, सदस्य मोहन वसावे चेअरमन प्रभाकर वळवी, तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन वसावे, ज्येष्ठ नागरिक तानाजी वसावे, अजनसिंग महाराज, देवीदास वसावे, करणसिंग वळवी, मोहन वसावे, उमाकांत वळवी, यशवंत वसावे, दादी वसावे, जेवू वळवी, फुलसिंग वळवी, सुफा वळवी, देविदास पवार, बाळू वळवी, अश्विन वसावे, प्रताप वळवी आदी उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs PAK, T20 WC 2024: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? समोर आलं चिंता वाढवणारं कारण

EAC-PM Report : लोकसभा निवडणुकीदरम्यान लोकसंख्येच्या अहवालावरून राजकारण तापलं; रिपोर्टमध्ये नेमकं आहे तरी काय?

Breaking News: इराणच्या ताब्यातून ५ भारतीय खलाशांची सुटका; भारताच्या परराष्ट्र नीतीचं मोठं यश

Sharad Pawar News | राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनकरणावर शरद पवार यांचे मोठे विधान

Health Tips: महिनाभर लसून कांदा नाही काल्यास शरीरात दिसतील 'हे' बदल

SCROLL FOR NEXT