Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : नर्मदा काठावरील आदिवासींचा जीवघेणा प्रवास थांबणार; १२ गावांना जोडणाऱ्या पुलासाठी ४८ कोटी रुपये मंजूर

Nandurbar News नर्मदा काठावरील आदिवासींचा जीवघेणा प्रवास थांबणार; १२ गावांना जोडणाऱ्या पुलासाठी ४८ कोटी रुपये मंजूर

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव इ अक्कलकुवा तालुक्यातील काही गावांतील लोकांना बॅकवॉटर मधून (Nandurbar) जीवघेणा प्रवास करावा लागत होता. परंतु आता नर्मदा काठावरील आदिवासींचा हा जीवघेणा (Narmada River) प्रवास थांबणार आहे. बिलगाव पुलासाठी ४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

नंदूरबार जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर नागरिक नर्मदा नदीच्या पलीकडे राहत असून या नागरिकांना जाण्यासाठी बिलगाव येथे जाण्यासाठी पूल तयार करण्यात येत होता. मात्र हा पूल गेल्या अनेक वर्षापासून अपुरे अवस्थेत होता. यामुळे धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील १० ते १२ गावांना येण्या जाण्यासाठी सोय नसल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर जीव धोक्यात घालून नर्मदा नदीच्या बॅक वॉटरमधून प्रवास करावा लागत आहे. यासाठी आदिवासी विकास विभागाकडून आता या पुलासाठी ४८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या पुलाचे काम आता लवकरच सुरू होणार आहे. 

नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पामुळे धडगाव तालुक्यांतील बिलगाव ते सवाऱ्यादिगर परिसरातील दहा ते बारा गावांना आणि पंधरा ते वीस पाड्यांना जोडणारा उदयनदीवरील गेल्या दहा ते बारा वर्षांपासून हा पूल अपूर्ण आवस्थेत आसल्याने जवळपास सात हजार नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. मात्र आदिवासी विकास विभागाकडून या पुलाच्या कामात पूर्ण होणार असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना येणे जाण्यासाठी मोठी सोय होणार आहे. या पुलाला पूर्ण तयार हो यासाठी अनेकदा तक्रारी निवेदन आणि आंदोलन केले होते मात्र आता या निवेदन तक्रारीने आंदोलनाला यश आला असून लवकरच हा बोल आता तयार होणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

SCROLL FOR NEXT