Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: तिन्ही तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस; ११ मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती

Nandurbar News : तीन तालुक्यात ३० टक्के पावसाची तूट; ११ मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती

Rajesh Sonwane

सागर निकवाडे  
नंदुरबार
: पावसाळा संपत आला तरी नंदुरबार जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar) नंदुरबार, शहादा व नवापूर तालुक्यात ३० टक्के पावसाची तूट आहे. यामुळे सर्वच लघु प्रकल्पांमध्ये (Rain) पाण्याच्या ठणठणात असून पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणात अवघा ४१ टक्के पाणीसाठा आहे. (Latest Marathi News)

पावसाळ्याचे चार महिने संपले असले तरी जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर आणि शहादा तालुक्यात पावसाची तूट कायम आहे. तिघी (Navapur) तालुक्यांमध्ये सरासरी ३० ते ३५ टक्के पावसाची तूट असल्याचे चित्र आहे. यावर्षीचा सर्वात कमी पाऊस शहादा तालुक्यात झाला असून पावसाचे प्रमाण ६५ टक्के इतकी आहे. नवापूर तालुक्यात ६८ टक्के तर नंदुरबार तालुक्यात ६९ टक्के पाऊस झाला आहे. पावसाची तूट आणि पावसाचा मोठा खंड यामुळे या तिन्ही तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे.  

दुष्काळी परिस्थिती 

तिन्ही तालुक्यातील ११ महसूल मंडळात दुष्काळी परिस्थिती असून या मंडळातील लघु तलाव आणि लघु बंधाऱ्यांमध्ये पाण्याच्या ठणठणात आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणात अवघा ४१ टक्के पाणीसाठा असून परतीच्या पावसावर सर्वांच्या नजरा लागून आहेत. जिल्ह्यातील पावसाचे तूट लक्षात घेता या तिघे तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा; अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून सरकार कशाची वाट पाहत आहे असा सवालही आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते राहुल गांधींच्या समर्थनार्थ नागपूर शहरातील राजभवन चौकात आंदोलन

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम, लाठीचार्जवरुन घमासान, संसद ठप्प

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT