Shreya Maskar
मुंबईत अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत, जी खूप कमी लोकांना माहितेय. पावसाळ्यात या ठिकाणी नक्की ट्रिप प्लान करा.
बाणगंगा तलाव वाळकेश्वर येथील १२ व्या शतकातील एक प्राचीन आणि पवित्र जलाशय आहे. बाणगंगा तलावच्या सभोवताली अनेक छोटी मंदिरे आहेत.
खोताची वाडी हे गिरगावमधील एक शांत आणि लपलेले गाव आहे. जिथे पोर्तुगीज शैलीचा प्रभाव असलेली रंगीबेरंगी लाकडी घरे आहेत.
गिल्बर्ट हिल हा अंधेरी येथील मेसोजोइक काळातील बेसाल्ट खडकाचा २०० फूट उंच अखंड स्तंभ, ज्याच्या माथ्यावर दोन छोटी जुनी मंदिरे आहेत.
शिवडी किल्ला १७ व्या शतकातील ब्रिटिशांनी बांधलेला आहे. आता जीर्ण झालेला हा किल्ला दलदलीच्या प्रदेश बनला आहे, हा प्रदेश हंगामी फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे.
महाकाली गुहा ही मुंबईत अंधेरी येथे आहे. ख्रिस्तपूर्व १ ल्या शतकापासून ते ख्रिस्तोत्तर ६ व्या शतकापर्यंतच्या काळातील, खडकात कोरलेल्या १९ बौद्ध स्मारकांचा समूह.
दक्षिण मुंबईतील मलबार हिल भागात असलेले वाळकेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित एक प्राचीन व ऐतिहासिक मंदिर आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.
NEXT : पावसाळ्यात वडाळा दिसतोय इतका सुंदर की तुम्ही पाहतच राहाल, आताच नोट करा पिकनिक स्पॉट्सची नावे