Nandurbar News Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar News : नंदूरबारच्या राड्याच्या दबक्या आवाजात चर्चा; 27 जणांना अटक, 200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदूरबार शहरात झालेल्या दगडफेकीचे कारण आता समोर येऊ लागले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर निकवाडे

Nandurbar Police : युवक-युवतीचा प्रेमविवाह झाला. हा राग मनात धरुन दाेन गटात वाद झाला. या वादाचे रुपांतर मारामारीत झाले. मारामारीचे पडसाद दगडफेकीपर्यंत पाेहचले. या राड्याचे प्रमुख कारण मात्र दबक्या आवाजात चर्चेली जात आहे.

नंदूरबार शहरात झालेल्या दगडफेकीचे कारण आता समोर येऊ लागले आहे. मंगळवारी मध्यरात्री अचानक पणे एका गटातील दिडशे पेक्षा अधिक जमावाने परिसरात दगड विटा आणि काचेच्या बाटल्यांचा तुफान मारा केला होता. (Latest Marathi News)

महाराष्ट्र व्यायाम शाळा ते अलिसाहब मोहल्ला या परिसरात हा सर्व प्रकार घडला असून एका व्यक्तीने प्रेमविवाहातून हा सर्व प्रकार झाल्याची माहिती मिळत आहे. 6 महिन्यांपूर्वी एका तरुणींनाने प्रेमविवाह केला होता. त्यानंतर तो तरुण काही महिन्यांपूर्वी परिसरात राहायला आला होता तेव्हापासून परिसरात धुसफूस सुरू होती आणि त्यामुळेच हा सर्व प्रकार झाल्याचं बोललं जातं आहे.

प्रेमविवाह करणाऱ्या तरूणालाही पोलिसांनी (police) ताब्यात घेतलं असून इतर 27 दंगखोर तरुणांना बुधवारी सायंकाळपर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे .तरुणाने केलेल्या प्रेमविवाह संदर्भात तपशील उपलब्ध झाला नसला तर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

200 जणांवर दंगल करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणे अशा विविध कलमांतर्गत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर प्रेमविवाह करण्याऱ्या तरुणाला घेतलं ताब्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: मृत व्यक्तीच्या फोटोसमोर अगरबत्ती लावावी की नाही?

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

Video : तेरे जैसा यार... दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गाणे भोवलं! तहसीलदाराचे निलंबन

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

SCROLL FOR NEXT