Nandurbar Lok Sabha Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha : नंदुरबार लोकसभेसाठी २१ अपक्ष उमेदवारी अर्ज; भाजप, काँग्रेस उमेदवारांची वाढणार डोकेदुखी

Nandurbar News : लोकसभा निवडणुकीसाठीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया २६ एप्रिलला होत आहे. यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार असून यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार असून राजकीय पक्षांचे जोरदार शक्ती प्रदर्शन सुरु आहेत. महायुती व महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात येत असून अपक्ष उमेदवार देखील अर्ज दाखल करत आहेत. यात (Nandurbar) नंदुरबार लोकसभा मतदार संघात आतापर्यंत २१ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. (Latest Marathi News)

लोकसभा निवडणुकीसाठीच्या (Lok Sabha Election) दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया २६ एप्रिलला होत आहे. यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार असून यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. नंदुरबार लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार असून अर्ज दाखल केल्यानंतर २९ एप्रिलला माघारीची तारीख आहे. यानंतरच येथील चित्र स्पष्ट होणार आहे. 

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नंदुरबार लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारांच्या अर्ज दाखल होत असल्याने काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांसाठी डोकेदुखीचे ठरणार आहे. आतापर्यंत २१ अपक्ष उमेदवारांनी ४२ अर्ज घेतल्यास आता अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या अपक्ष उमेदवारांमुळे मतदानाच्या गणित बिघडणार आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपाच्या (BJP) उमेदवारांसाठी डोकेदुखीचे ठरणार आहे. परंतु २९ एप्रिलला माघारीची तारीख असल्याने कोण उमेदवार अर्ज मागे घेतात हे पाहणं आता महत्त्वाच्या ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Swiggy CEO networth : स्विगीचे सीईओंचं शिक्षण आणि नेटवर्थ किती?

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT