Nandurbar News  Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : नंदुरबार शहरवासीयांना पाण्याच्या प्रश्न मिटणार; पाणी टंचाई दूर करण्यासाठी २०० कोटी रुपयांची योजना

Nandurbar News : नंदुरबार शहरात पाणी टंचाईची समस्या प्रकर्षाने जाणवत असते. सध्या पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने भर पावसाळ्यात देखील शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यासह जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या जाणवत असते. प्रामुख्याने नंदुरबार शहरात उद्भवणाऱ्या टंचाईने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. दरम्यान नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात अवघ्या २५ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने शहराला पिण्याचे पाण्याची समस्या उद्भवणार आहे. हि समस्या दूर करण्यासाठी मंत्री विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नातून २०० कोटी रुपयांची योजना आणली आहे. 

नंदुरबार (Nandurbar) शहरात पाणी टंचाईची समस्या प्रकर्षाने जाणवत असते. सध्या पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने भर पावसाळ्यात देखील शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात (Water Scarcity) पाणी टंचाईची समस्या जाणवणार नाही; यासाठी राज्य सरकार सर्व भार आपल्या खांद्यावर घेऊन नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्ध करून देणार असल्याचे मंत्री गावित यांनी सांगितले. 

सहा महिन्यात योजना करणार पूर्ण 

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात अवघ्या २५ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने टंचाई जाणवू शकते. यासाठी तापी नदी वरून पाणी विरचक धरणात टाकले जाणार आहे. यासाठी २०० कोटी रुपये खर्च येणार असून सहा महिन्याच्या आत ही योजना पूर्ण होणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी दिली आहे. या योजनेमुळे शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न मिटणार आहे. तर पाणीपट्टी देखील वाढवली जाणार नाही. त्यामुळे शहरवासीयांना याच्या मोठा फायदा होणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शांतता कालावधी सोमवारच्या संध्याकाळपर्यंत

Manipur Politics : भाजपला मोठा झटका; NPPने पाठिंबा काढला, मणिपूरमध्ये नेमकं काय घडलं?

Pushpa 2 : The Rule Trailer : ''पुष्पा, फायर नहीं, वाइल्ड फायर है..'', पुष्पा 2 : द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Health Tips: झोपण्यापूर्वी गूळ खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

China: तुम्हाला माहिती आहे का? चीनमध्ये मुलांना 'या' अनोख्या गोष्टी शिकवल्या जातात

SCROLL FOR NEXT