Nandurbar News Sarangkheda Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: सारंगखेडा बॅरेजचे १५, प्रकाशा बॅरेजचे १७ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

सारंगखेडा बॅरेजचे १५, प्रकाशा बॅरेजचे १७ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

दिनू गावित

नंदुरबार : हतनूर धरणाचे सर्व गेट उघडले असल्‍याने तापी नदीत पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. यामुळे तापी नदीवरील (Sarangkheda) सारंगखेडा बॅरेज व प्रकाशा बॅरेजचे दरवाजे आज उघडण्यात आले आहेत. (Nandurbar News Tapi River)

हतनूर धरणाचे (Hatnur Dam) ४१ गेट पूर्ण क्षमतेने उघडून एकुण १ लाख ४६ हजार २८ क्यूसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे. संभाव्य पूर परिस्थिती लक्ष्यात घेता व पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे १५ द्वार पूर्ण क्षमतने उघडुन १ लाख १६ हजार २७९.१७ क्युसेक्स आणि प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे १७ द्वार पूर्ण क्षमतेने उघडुन १ लाख २४२.१५ क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात (Tapi RIver) सोडण्यात येत आहे.

गावांना सतर्कतेचा इशारा

तापी नदीत पाण्याचा येवा लक्षात घेता वरील प्रकल्पांतून विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीकाठांवरील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : मोदीजी, हे ५ कोटी कुणाच्या 'सेफ'मधून निघाले? राहुल गांधींच्या प्रश्नावर विनोद तावडे म्हणाले, तुम्ही स्वतः नालासोपाऱ्यात या!

Maharashtra Election : ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर काय असणार सुविधा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra News Live Updates: विनोद तावडे यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढला

Vinod Tawde: विनोद तावडेंच्या डायरीत नेमकं काय-काय मिळालं?

Johnny Tiger Migrate : जोडीदाराची ओढ, ३० दिवस, ३०० किलोमीटर प्रवास; 'जॉनी' वाघाची अनोखी स्टोरी!

SCROLL FOR NEXT