Navapur News Saam tv
महाराष्ट्र

Navapur News : मृत्यूनंतरही आदिवासी बांधवांच्या मरण यातना संपेना; अंत्यसंस्कारासाठी नदीतून जीवघेणा प्रवास

Nandurbar News : नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील एक विदारक चित्र समोर आले आहे. तालुक्यातील शेगवे गावात लोकांना त्यांच्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी नदी पार करावी लागली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एका झाडाच्या सहाराने नदी ओलांडावी लागते. ही घटना ताजी असतानाच नवापूर तालुक्यातील नेसू नदी पार करून अंत्यविधीसाठी जीव धोक्यात वाट काढावी लागत असल्याचं दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामुळे आदिवासी पाड्यांवर मृत्यूनंतरचे मरण यातना संपत नसल्याचे प्रत्यय येत आहे. 

नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील एक विदारक चित्र समोर आले आहे. तालुक्यातील शेगवे गावात लोकांना त्यांच्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी नदी पार करावी लागली. धक्कादायक बाब म्हणजे स्मशानभूमीत जाण्यासाठी पूल नाही, तसेच अन्य कोणताही मार्ग नसल्याने त्यांनी नदीतील वाहत्या प्रवाहाच्या पाण्यात उतरून नदी ओलांडली. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाताना कुटुंबीयांनी स्वत:चा जीव धोक्यात घातला आहे. हा भयावय घटनेचा व्हिडीओ समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. 

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष 
नवापूर तालुक्यातील शेवगे गावातील अंत्यविधीसाठी नदीपलीकडे जाऊन अंत्यसंस्कार करावे लागतात. तालुक्यात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नेसू नदीला पूर आला आहे. पुलाअभावी नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून मृतदेह घेऊन मार्ग काढत नातेवाईकांना अंत्यविधी करावा लागत आहे. मात्र याकडे मात्र स्थानिक आमदार डोळ्यावर झापडे लावून बसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

लाकडे नेण्यासाठीही फेरा 

शेगवे गावातील इमाबाई वसावे त्यांचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी नातेवाईकांना नदी पार करावी लागली. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी मृतदेह खांद्यावर घेऊन जात आहेत. स्मशानभूमी ही नदीच्या दुसर्‍या बाजूला आहे. तिथे जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नसल्याने कुटुंबावर ही वेळ आली आहे. शिवाय अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे व इतर साहित्य फेरा मारून न्यावे लागत आहे. तालुका आणि जिल्हा प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 : पुण्यात ३० तासानंतरही विसर्जन मिरवणुका सुरुच, गणेश मंडळाने डीजे लावला अन् फटाके फोडले, पोलिसांचा आदेश धाब्यावर

शरीरात प्रोटीनची कमतरता झाल्यास दिसतात 'हे' बदल

Washim Police : बंदी असताना विसर्जन मिरवणुकीत वाजविला डिजे; १७ मंडळांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई

Maharashtra Live News Update: विरारमध्ये ४० वर्षे जुनी इमारतीचा स्लॅब कोसळला

विसर्जनाला उशीर! लालबागचा राजा ६ तासांपासून चौपाटीवरच, नेमकं कारण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT