Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar : चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; नेसू नदीवर पूल नसल्याने पुरातून काढावा लागतो मार्ग

Nandurbar News : नवापूर तालुक्यातील वाघेरे गावात गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ नेसू नदीवर पूल आणि रस्त्याची मागणी करत आहेत. परंतु त्यांच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थ हतबल झाले आहेत

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यातील भीषण वास्तव पुन्हा पुन्हा समोर येत आहे. नवापूर तालुक्यातील वाघेरे गावातील विद्यार्थी आणि नागरिकांना दररोज नेसू नदीच्या धोकादायक पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. शिक्षणासाठी शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनाही आपल्या पालकांचा हात धरून पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागते, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील केळखाडी पाड्यातील मुलांना शिक्षणासाठी जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचे मागील आठवड्यात समोर आले होते. यानंतर या ठिकाणी नदीवर पूल बांधण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. यानंतर आता नवापूर तालुक्यातील वाघेरे गावातील चिमुकल्यांना शाळेत जाण्यासाठी पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.

ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी 
दरम्यान नवापूर तालुक्यातील वाघेरे गावात गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ नेसू नदीवर पूल आणि रस्त्याची मागणी करत आहेत. परंतु त्यांच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थ हतबल झाले आहेत. पावसाळ्यात नदीला पूर आल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत असते. जाण्यास कोणताही पर्यायी मार्ग नसल्याने नाईलाजाने नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातुन मार्ग काढावा लागत असतो. 

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास 
आता तर शाळेत जाणाऱ्या मुलांना या नदीच्या पुराच्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. या प्रश्नाकडे खांडबारा गावाचे सरपंच अविनाश गावित आणि स्थानिकांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि ग्रामस्थांच्या सोयीसाठी नेसू नदीवर तातडीने पूल बांधण्याची मागणी त्यांनी केली आहे. या जीवघेण्या प्रवासातून लवकरात लवकर सुटका मिळण्याची अपेक्षा ग्रामस्थ करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : पार्टनरसाठी पैसा खर्च करावा लागणार; ५ राशींचे लोक संधीचं सोनं करणार, वाचा

Shocking : बापरे! ९८ टक्के भरलेल्या धरणावर कारचालकाची स्टंटबाजी; व्हिडिओ पाहून फुटेल घाम, VIDEO

Relationship Dispute : लग्नाचं आश्वासन देऊन ठेवलेले शारीरिक संबंध दुष्कर्म ठरत नाहीत : कोर्ट

Viral Video : अभिनेत्याचं स्टेजवर अभिनेत्रीशी गैरवर्तन, थेट कमरेत घातला हात; सोशल मीडियावर होतंय ट्रोलिंग

Asia Cup 2025: टीम इंडियातील किती खेळाडूंचे लग्न झाले तर किती अविवाहित?

SCROLL FOR NEXT