Navapur News Saam tv
महाराष्ट्र

Navapur News : मासे पकडण्यासाठी टाकलेले जाळे काढताना झाला घात; विजेचा झटका बसल्याने एकाचा मृत्यू

Nandurbar News : जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील भरडू नागन मध्यम प्रकल्प धरणाच्या पाण्यात फुगाऱ्यात बसून मासेमारी करण्याची नेहमीची सवय होती

Rajesh Sonwane

नंदुरबार : कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मासेमारी करण्याचा व्यवसाय होता. नेहमीप्रमाणे धरणावर मासेमारी करण्यासाठी गेलेल्या इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नवापूर तालुक्यातील भरडू नागन मध्यम प्रकल्प धरणात मासेमारी करत असताना विजेचा जोरदार झटका लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

अर्जुन धनजी गावित (रा. केळी वय ५८) असे घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव‎ आहे. (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील भरडू नागन मध्यम प्रकल्प धरणाच्या पाण्यात फुगाऱ्यात बसून मासेमारी करण्याची नेहमीची सवय होती. रात्री जाळे टाकून सकाळी ते गोळा करण्यासाठी जात होते. त्यानुसार नेहमीप्रमाणे रात्री धरणाच्या पाण्यात मासे पकडण्यासाठी टाकलेले जाळे काढण्यासाठी अर्जुन गावित हे आज (२ सप्टेंबर) सकाळी धरणावर गेले होते. 

जाळे काढताना झाला घात  

जाळे गोळा करतांना धरणातील पाण्याच्या वरील बाजूला असलेली शेताच्या मोटार पंपासाठी जोडलेली विद्युत वाहिनीला स्पर्श झाला. धरणाच्या काठावर पाण्यात असल्याने (electric Shock) विजेचा जोरदार झटका बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर मृतदेह‎ शवविच्छेदनात करिता विसरवाडी ग्रामीण‎ रुग्णालयात पाठविण्यात आले.‎ यावेळी नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai -Pune Expressway : नियम मोडाल तर टप्प्यात याल! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांवर आता बारीक नजर!

Pankaja Munde : महायुतीतून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? पंकजा मुंडे थेट बोलल्या

Maharashtra News Live Updates: पूजा खेडकर प्रकरण सुनावणी अपडेट : दिल्ली हायकोर्टातील आजची सुनावणी टळली

Team India: विराट- रोहितने आता एकच काम करावं..ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने दिला लाखमोलाचा सल्ला

Cyber Crime : ऑनलाइन जॉबची ऑफर आली, तरूणही भुलला, टप्प्याटप्प्याने पुढे घडलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली!

SCROLL FOR NEXT