Nagan Project Saam tv
महाराष्ट्र

Navapur Nagan Project : अतिवृष्टीमुळे भरडूच्या नागण मध्यम प्रकल्पाचे दरवाजे उघडले; गावांना सतर्कतेचा इशारा

Nandurbar News : नवापूर तालुक्यातील भरडू येथील नागन मध्यम प्रकल्प या प्रकल्पाच्या धरण क्षेत्रात व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे सदर धरणाच्या पाणी पातळीत वाढ

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात झालेल्या रात्रीच्या सुमारास झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यात तालुक्यातील भरडूच्या नागण मध्यम प्रकल्पात देखील पाण्याच्या मोठ्या प्रमाणात साठा जमा झाल्याने नागन माध्यम प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. 

नवापूर (Navapur) तालुक्यातील भरडू येथील नागन मध्यम प्रकल्प या प्रकल्पाच्या धरण क्षेत्रात व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे सदर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सद्यास्थितीत पाणी पातळी २०३.५० मी.ची नोंद झाली आहे, यामुळे धरणात ७६ टक्के क्षमतेने पाणीसाठा निर्माण झाला आहे. सदर धरणाची पूर्ण संचय पातळी २०५.३० मी. असून धरण आणि पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस (Heavy Rain) झाल्यास व धरणात पाण्याचा आवक वाढल्यास नागन धरणाचे तीन ही वक्र दरवाजे उघडून नागन नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आले आहे. यासाठी नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथकाने नंदुरबार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांना माहीती देण्यात आली आहे.

नागन नदीच्या काठावरील भरडू, महालकडू, तारपाडा, सोनारे, बंधारे, भांगरपाडा, बिलबारा, देवळीपाडा, दुधवे, नवागांव यासह नागन नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रामध्ये गुरढोरे सोडण्यात येऊ नये व कोणत्याही मनुष्याने नदीपात्रात जावू नये तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. तरी तलाठी, कोतवाल या यंत्रणेव्दारे नदीकाठच्या गावांना सावधगिरी व सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT