Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Bus Accident: जामनेर- सुरत बस, ट्रकची समोरासमोर धडक; १० प्रवाशी जखमी

Nandurbar News : राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे नवापूर तालुक्यात अपघात वाढले असल्याचे बोलले जात आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाची जामनेर- सुरत बसला नावापूरजवळ अपघात झाला आहे. बस व (Nandurbar) ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात (Accident) झाला असून यात ८ तस १० प्रवाशी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. (Breaking Marathi News)

महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या नावापूरजवळील सीमा तपासणी नाक्याजवळ हा अपघात झाला आहे. आज सकाळी जामनेरहून सुरतकडे बस मार्गस्थ झाली होती. नवापूर बसस्थानकावरून (Bus Accident) बस निघाल्यानंतर दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास नागपूरच्या सीमा तपासणी नाक्याजवळ आल्यानंतर सुरतकडून महाराष्ट्र राज्यात येणारा ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. अपघातात जवळपास ८ ते १० प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जखमी रुग्णालयात दाखल 

अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातात जखमी प्रवाशांवर नवापूर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. महामार्गावरील वाढत्या अपघाताच्या प्रमाणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे नवापूर तालुक्यात अपघात वाढले असल्याचे बोलले जात आहे. जामनेर सुरत बस मधील प्रवाश्यांना पर्यायी बस व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT