Nandurbar News Saam Tv
महाराष्ट्र

नंदुरबार, गुजरातकडे अवैधरित्या वाहतूक होणाऱ्या ४३ लाखांचा मद्यसाठा जप्त

कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार: धुळे -सुरत राष्ट्रीय महामार्गावरील अॅपल हॉटेल समोर साक्रीहून सुरतकडे (Surat) जाणाऱ्या कंटेनरमध्ये अवैधरित्या वाहतूक होणारी ४३ लाखांची विदेशी बनावट दारू जप्त केली आहे. दरम्यान, या कारवाईत कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

मिळालेली माहिती अशी, नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर क्रमांक जी.जे.06 ए.झेड.3560 मध्ये विदेशी बनावटची रॉयल विस्की दारुची वाहतूक गुजरात राज्यात होत आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस (Police) अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल दादाभाई मासुळे, राजेंद्र काटके, जितेंद्र ठाकूर तुषार पाटील, आनंदा पाटील, विसरवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी महामार्गावर सापळा रचून कंटेनर अडविला.

दरम्यान, तपासणीत कंटेनरमध्ये विदेशी बनावटची रॉयल विस्कीचे बाक्स आढळून आल्याने पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला आहे. विसरवाडी पोलीस (Police) ठाण्यात कारवाई केली आहे. या कारवाईत 43 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. पर राज्यातून महाराष्ट्र मार्गे गुजरातमध्ये अवैध मद्यसाठा वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर कारवाई केल्याने दारू तस्करांचे धाबे दणाणले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT