दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या विरोधात जिल्हा पोलीस दलाची धडक कारवाई... दिनू गावित
महाराष्ट्र

दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या विरोधात जिल्हा पोलीस दलाची धडक कारवाई...

एका दिवसात 43 मद्यपी वाहनचालकांवर गुन्हा दाखल...

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार - जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा रस्ते अपघात व अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत वाढ झाल्याने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने दारू पिऊन वाहन चालवणार्‍या चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. ४ डिसेंबर रोजी केलेल्या कारवाईत नवापूर, विसरवाडी, मसावद, सारंगखेडा, मोलगी, धडगाव, तळोदा, अक्कलकुवा, नंदुरबार अशा १३ पोलीस स्टेशन अंतर्गत ४३ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील पहा -

सदर दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांचे लायसन्स देखील रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असून आगामी सण-उत्सव काळात दारू पिऊन दुचाकी व चारचाकी वाहन चालवणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरूच राहणार असून कडक कारवाईचा इशारा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिला आहे. दारू पिऊन वाहन चालविणे स्वतःसाठी व इतरांसाठी धोकादायक असून नागरिकांनी मी स्वतः व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळावे असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala Chaas Recipe: जेवणानंतर पिण्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा, टेस्टी मसाला ताक, नोट करा रेसिपी

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या चाऱ्याची इतर जिल्ह्यांत वाहतूक करण्यास प्रतिबंध

पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पो अन् दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO

Relationship Tips: सासूबाईंची आवडती सून होण्यासाठी करा 'या' ५ गोष्टी; सासरवाडीत व्हाल सर्वांच्या लाडक्या

Tuesday Horoscope: संपत्तीत वाढ होणार! ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT