तीनच महिन्यात नंदुरबार जिल्ह्या कोरोनामुक्त; बाधितांची संख्या शुन्यावर! SaamTv
महाराष्ट्र

तीनच महिन्यात नंदुरबार जिल्ह्या कोरोनामुक्त; बाधितांची संख्या शुन्यावर!

जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या शुन्य झाल्याने आणि शेवटच्या कोरोना बाधीताचा मृत्यु होवुन ५० दिवसांहुन अधिकचा कालावधी उलटल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याची कोरोनामुक्त जिल्ह्याकडे वाटचाल होत असुन जिल्ह्यात सध्या एकही अँक्टीव्ह रुग्णActive patientनाही आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये कोरोना अँक्टीव्ह रुग्णसंख्या शुन्य झाल्याने आणि शेवटच्या कोरोना बाधीताचा मृत्यु Deathहोवुन पन्नास दिवसांहुन अधिकचा कालावधी उलटल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. Nandurbar district Corona liberated in just three months; Number of victims at zero

हे देखील पहा-

आरोग्याच्या अतिशय तोकड्या सुविधा आणि त्यातही अपुरे मनुष्यबळ म्हणुन नंदुरबारची ओळख आहे. त्यामुळेच कोरोनाच्या लाटेत नंदुरबारमध्ये प्रचंड संकट येण्याचे संकेत वर्तवले जात होते. मार्च एप्रिल महिन्यात लोकांना जिल्ह्यात बेड आणि ऑक्सिजन Oxygenमिळत नसल्याने कोरोना बाधीतांचे प्रचंड हाल झाले. मात्र यानंतर अवघ्या तीनच महिन्यात नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना बाधतांची संख्या शुन्यवर पोहचली आहे. गेल्या पंधरा दिवसात एकही कोरोना बाधीत आढळुन आला नसुन जिल्हा सामान्य रुग्णालयातhospital एकही कोरोना बाधीत उपचार घेत नसल्याने आता तब्बल साडे चारेशहुन अधिक बेड हे खाली आहेत. यामुळे आरोग्य यंत्रनेवरचा त्रास काहीसा कमी झाला असुन याबाबत एकत्रीत परिश्रमाची फलश्रुती असल्याचे यंत्रनेला मत डॉ रघुनाथ भोये जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबारNandurar यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात गेल्या चाळीस दिवसांपासुन एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही आहे. तर दुसरीकडे शहादा, अक्कलकुवा, नवापुर आणि तळोदा, नंदुरबार सारखे तालुक्यांमधील अँक्टीव्ह कोरोणा बाधीतांची संख्या हि शुन्य झाली आहे.  विशेष म्हणजे कोरोणामुळे मृत्यु पावलेल्याही आता पन्नास दिवसांहुन अधिकचा कालावधी उलटला आहे. त्यामुळेच आरोग्य यंत्रनेने आता आपल सार लक्ष नियमित आजार आणि त्यावरच्या औषधोपचारांकडे केंद्रीत केले आहे.

कोरोना काळCorona period सुरु झाल्यानंतर फक्त २० ऑक्सिजन बेडची सुविधा असलेला आरोग्यातील तोकडा नंदुरबार कोरोनाचा सामना कसा करेल हा प्रश्न होता. त्यातच खडतर भौगोलीक परिस्थीत असलेल्या या जिल्ह्यात तळागाळापर्यंत कोरोना पोहचला तर परिस्थीती किती भयावह होईल हि बाब आरोग्य यंत्रनेसाठी चिंतेची होती. मात्र संकटातुन संधी शोधत कोरोना काळात ऑक्सिजन स्वयंस्फुर्ती सोबतच सुसज्ज बिल्डींग, अनेक बेडची उपलब्धता, रुग्णवाहीका, शववाहीका, आरोग्य पुरवणारे वैद्यकीय कर्मचारी बाबतीत भरारी घेत नंदुरबार जिल्ह्याने आता कोरोना मुक्तीकडे वाटचाल केली आहे. मात्र जर नंदुरबार जिल्हा हा कोरोना मुक्त ठेवायचा असेल तर लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे प्रतिक्रिया जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे. तसेच जिल्हा संसर्ग मुक्त ठेवण्यासाठी लसीकरण वाढवण्यासोबतच नंदुरबारकरांनी कोरोना प्रतिबंधतात्क उपायांची आगामी काळातही अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात कोण कोण भाषण करणार?

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

SCROLL FOR NEXT