Nandurbar Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nandurbar Crime News: 4 हजार केळीची झाडे एका रात्रीत भूईसपाट; माथेफिरुच्या कृत्याने शेतकरी मेटाकुटीला

Nandurbar News: तब्बल 4 हजार पेक्षा अधिक केळीची झाडे एका माथेफिरुने कापली आहेत.

Ruchika Jadhav

सागर निकवाडे, नंदूरबार

Nandurbar News: शहादा तालुक्यातील ब्राम्हणपूरी या गावातील शेतकरी प्रकाश पाटील आणि भीकन पाटील यांच्या कोळीच्या बागेतील झाडे एका माथेफेरूने कापून टाकली आहेत. तब्बल 4 हजारांपेक्षा अधिक केळीची झाडे एका माथेफिरुने कापली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.(Latest Marathi News)

फळ बागा असलेल्या व्यक्तींचा उदनिर्वाह याच फळांवर अवलंबून असतो. अशात हातातोंडाशी आलेली केळीची झाडे अशा पद्धतीने कपून टाकल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर माथेफेरीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून केळीचे झाड कापून फेकण्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. अनेक माथेफिरुंवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. मात्र या आरोपींवर कठोर कारवाई केली जात नाही आहे. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे.

आरोपींना तात्काळ शोधावे आणि कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. पोलीस विभागाने या आरोपींचा लवकर शोध घेतला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे शासनाने त्यांना देखील भरपाई द्यावी अशी मागणी यावेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते घनश्याम चौधरी यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरात DJ विरोधात आज ‘मूक मार्च’काढण्यात येणार

Sugar Free Modak : ना शुगर ना मैदा! खजूर-अंजीरचे मोदक बनवा झटपट, डायबिटीज असणारेही आवडीने खातील

Rain Update : राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुंबईसह २० जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज

Manache Ganpati : बाप्पाच्या आगमनाची वेळ ठरली! पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी विराजमान होणार? वेळ आणि पथकांची यादी एका क्लिकवर

Nerul Tourism : मॉन्सूनमध्ये नेरुळची सफर ठरेल अविस्मरणीय, वीकेंडला फिरायला 'ही' ५ ठिकाणं आहेत एकदम खास!

SCROLL FOR NEXT