Crime news  Saam Tv file pic
महाराष्ट्र

Nandurbar Crime News : महाराष्ट्र हादरला! ६ वर्षीय मुलीवर आधी अत्याचार, त्यानंतर हत्या करून केळीच्या बागेत फेकला मृतदेह

Nandurbar Crime News in Marathi : नंदूरबारमध्ये ६ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने मुलीची हत्या करून केळीच्या बागेत मृतदेह फेकला.

Vishal Gangurde

सागर निकवाडे, साम टीव्ही

नंदूरबार : राज्यात लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना सुरुच आहे. बदलापूरनंतर नंदूरबारमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नंदूरबारच्या तळोदा तालुक्यातील खरवडमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. नंदूरबारमधील या घटनेने राज्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर नंदूरबार पोलिसांनी २४ तासांत आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदूरबारच्या तळोदा तालुक्यातील खरवड येथे खळबळजनक घटना घडली आहे. जिल्हा परिषदेची शाळा शिकणाऱ्या सहा वर्षीय मुलीचं अपहरण करून हत्या झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर पोलीस विभागाने तातडीने या गुन्ह्याची दखल घेत आरोपीला २४ तासांच्या बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

खरवड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी ६ वर्षीय मुलगी १२ तारखेला शाळेतून घरी परतली नाही. बराच वेळ झाल्यानंतरही मुलगी घरी परतली नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली.

पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी पुढील शोध सुरु केला. पोलिसांच्या तपासात मुलगी एका नातेवाईकांसोबत दुचाकीवर बसून गेल्याची नोंद सीसीटीव्हीत दिसून आली. त्यानंतर पुढील तपासात मुलीचा मृतदेह एका केळीच्या बागेत सापडला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणाचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

१३ वर्षीय मुलीवर रिक्षा चालकाकडून अत्याचार

मुंबईतील चेंबूरमध्ये १३ वर्षीय चिमुरडीवर रिक्षा चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळेत जात असताना रिक्षा चालकाने मुलीवर हात टाकला. त्यानंतर चिमुरडीला पडक्या इमारती नेऊन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आईला काही न सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. चेंबूर येथील धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे. =

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT