Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar : तरुणाच्या हत्येने आदिवासी समाज संतप्त; नंदुरबार जिल्ह्यात कडकडीत बंद, मारेकरीची शहरातून काढली धिंड

Nandurbar News : आदिवासी तरुणाचा हत्तेच्या निषेधार्थ आज जिल्हा बंद पुकारण्यात आला असून सकाळ पासूनच जिल्ह्यातील दुकाने बंद, मृत जयेश भीलच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षेची मागणी आदिवासी समाज बांधवांकडून कारणात येत आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : किरकोळ वादातून नंदुरबार शहरातील मार्केट परिसरात भररस्त्यावर चाकूने हल्ला करत तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. या घटनेनंतर शहरात तीव्र पडसाद उमटत असून आदिवासी समाज देखील संतप्त झाला आहे. आरोपीला कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यात कडकडीत बंद पाडण्यात येत आहे.

किरकोळ वादातून नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात भैय्या मराठे नामक युवकाने जय भिल या तरुणावर चाकुने प्राणघातक हल्ला केला होता. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला उपचारासाठी सुरत येथे हलविण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूनंतर आदिवासी समाज बांधव आक्रमक झाला असून घटनेच्या तिसऱ्या दिवशी देखील नंदुरबार शहरात तणावाचे वातावरण पाहण्यास मिळत आहे.  

सकाळ पासूनच जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद

नंदुरबार शहरात किरकोळ वादावरून जय भील याची हत्या झाल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मात्र या घटनेचा आदिवासी संघटनाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत असून आज जिल्हा बंद करण्यात आलेला आहे. जिल्हा बंदची हाक दिल्याने व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद ठेवली आहेत. यामुळे सर्वत्र शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. 

आरोपीची पोलिसांनी काढली शहरातून धिंड 
शहरात किरकोळ वादावरून झालेल्या हत्येच्या निषेधार्थ नंदुरबार शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. आदिवासी समाज बांधवांकडून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी; या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर पोलीस देखील ऍक्शन मोडमध्ये आले असून अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आज त्याची शहरातून धिंड काढण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : नरीमन पॉईंट ते विरार फक्त ३५ मिनट, कोस्टल रोड प्रोजेक्टवर मोठी अपडेट

Duplicate Voter Verification: निवडणुकांच्या तारखा लवकरच? दुबार मतदारांना चाप, आयोगाचे घरोघरी तपासणीचे आदेश|VIDEO

प्रणित मोरे 'Bigg Boss 19'मध्ये पुन्हा येणार? सलमान खान काय म्हणाला? वाचा सविस्तर

Cyclone Alert : महाराष्ट्रावर नव्या वादळाचं संकट? १५ जिल्ह्यात धो धो पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट

Maharashtra Live News Update: पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको तूर्तास स्थगित

SCROLL FOR NEXT