Shahada News Saam tv
महाराष्ट्र

Shahada News : बंदुकीचा धाक दाखवत दोन ट्रक लुटण्याचा प्रयत्न; रोकड घेऊन फरार, एक चोरट्याला पकडले

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरामध्ये असलेल्या सावर्दे फाट्याजवळ लुटमारीचा प्रकार घडला. यामध्ये रेशन दुकानावर तांदूळ आणि गहू भरून जाणाऱ्या दोन ट्रक चोरट्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : सुमसाम रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडवून लूटमार करण्याचे प्रकार सुरु आहेत, अशाच प्रकारे नंदुरबार जिल्ह्यात रेशनचे गहू व तांदूळ घेऊन जाणाऱ्या दोन ट्रकला थांबवून बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये काही चोरटे रोख रक्कम घेऊन पसार झाले आहेत. तर यातील एका चोरट्याला पकडण्यात यश मिळाले आहे. यामुळे अन्य चोरट्यांचा देखील शोध लागू शकेल. 

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरामध्ये असलेल्या सावर्दे फाट्याजवळ हा लुटमारीचा प्रकार घडला आहे. या प्रकारामध्ये रेशन दुकानावर तांदूळ आणि गहू भरून जाणाऱ्या दोन ट्रक चोरट्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला आहे. सावळदे फाटा पासून दोन दुचाकीस्वार वाहनांचा पाठलाग करत लुटण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी ट्रक चालकांना बंदुकीचा धाक दाखविला. हा प्रकार ट्रक चालकांचा लक्षात आल्याने त्यांनी ट्रक जोरात नेण्यास सुरवात केली. 

ओव्हरटेक करत अडविले ट्रक 

मात्र मोटरसायकलवर असलेल्या चोरट्यांनी दुचाकी आणखी जोरात नेत ट्रकच्या पुढे जात मोटरसायकल ट्रकला आडवी केली. यानंतर बंदुकीचा धाक दाखवून त्यांचाकडून मोबाईल व ५० हजार रुपये घेऊन ट्रक चालकांना मारहाण करण्यात आली. अचानक घडलेल्या या प्रकाराने ट्रक चालक देखील भांबावून गेले होते. त्यामुळे त्यांनी स्वतःजवळील रक्कम व मोबाईल चोरट्याना दिली. 

एका चोरट्याला पकडले 

दरम्यान घडलेल्या प्रकाराबाबत जवळच असलेल्या टाकरखेडा गावात माहिती मिळताच टाकरखेडा व सारंगखेडा येथील नागरिकांनी घटनास्थाळी धाव घेतली. यानंतर ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत एका चोरट्याला पकडले. मात्र इतर चोरटे एका मोटारसायकल गाडीचा डिक्कीत बंदूक, धारदार शास्र हे सोडून पळत जवळच्या शेतात पळ काढला. तर एका चोरट्याला पकडण्यात गावकर्यांना यश आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bahadurgad Fort History: छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला बहादूरगड, वाचा इतिहास

Skin Care Tips: दिवाळीत दिसा सुंदर! या 3 सोप्या घरगुती उपायांनी मिळवा नॅचरल ग्लो

Dhanteras Puja: धनत्रयोदशीची पूजा कशी करायची? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि साहित्य

Maharashtra Live News Update : निलेश घायवळचा जामीन रद्द करावा, पुणे पोलिसांची न्यायालयाला विनंती

Bigg Boss 19: 'तू खूप निर्लज आणि इरिटेटिंग...'; शेहबाजवर संतापला सलमान खान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT