Nandurbar Shahada Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar : नवऱ्याचं दुसरीसोबत अनैतिक संबंध, बायकोला कळाल्याने अमानुष मारहाण; महिलेनं संपवलं आयुष्य

Nandurbar Shahada Crime News : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे पतीच्या विवाहबाह्य संबंध व सततच्या शारीरिक-मानसिक छळाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केली. पती व प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • शहाद्यात २९ वर्षीय विवाहित महिलेची आत्महत्या

  • पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे सतत छळ

  • आईच्या तक्रारीवरून पती व प्रेयसीविरुद्ध गुन्हा

  • पती पोलिस कोठडीत, प्रेयसी न्यायालयीन कोठडीत

  • परिसरात तीव्र संताप आणि हळहळ

पतीच्या विवाहबाह्य संबंध आणि सततच्या शारीरिक-मानसिक छळाला कंटाळून एक विवाहित महिलेने आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील रमकुबाई नगरात सदर घटना घडली आहे. भाग्यश्री गौरव चौधरी ( वर्षे २९ ) असे या मृत महिलेचे नाव आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार गौरव चौधरीने भाग्यश्रीला वेळोवेळी मारहाण केली. त्याच्या विवाहबाह्य प्रेयसीबरोबरचे संबंध असल्याने भाग्यश्रीने समजावण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण त्यात यश मिळाले नाही. उलट, तिला अधिक जाच सहन करावा लागला. भाग्यश्रीच्या माहेरील आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने तिने हा अन्याय लपवला. मात्र, नेहमीच्या कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले.

भाग्यश्रीच्या आईने संगीता सुनील चौधरी यांनी शहादा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यात सांगितले की,भाग्यश्रीचा पती गौरवकुमार जगदीश चौधरी (वर्षे ३५) याचे बऱ्याच वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. याबाबत पत्नीचा तीव्र विरोध असल्याने गौरवकडून तिचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ होत होता.

मृत भाग्यश्री चौधरीच्या आईच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसांनी गौरव चौधरी आणि त्याच्या प्रेयसीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली असून शहादा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के.जे. पटेल यांच्या कोर्टात दोघांना हजर केले गेले. यात गौरव चौधरीला १९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी, तर प्रेयसीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk Dishes : घरच्या घरी दुधापासून बनणाऱ्या ५ स्वादिष्ट डिश, एकदा करुन बघा

Maharashtra Live News Update: महापालिकेच्या बीओटी तत्वावर सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणची सरंक्षक भिंत कोसळली

Pune : शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवारावर जीवघेणा हल्ला; धारदार कोयत्याने वार,पुण्यात खळबळ

Nail cancer signs: नखांवर काळी रेघ दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका; कॅन्सरचं लक्षण असल्याचं तज्ज्ञांचं मत

भाजपने शेवटच्या क्षणी काढलं मराठी कार्ड; मित्रपक्षाचा बडा नेताही फोडला

SCROLL FOR NEXT